कसमादे पट्टयात पावसामुळे कांदा पिकाला फटका
मोठाभाऊ पगार
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

नजर लागावी तशी कांदाभावात घसरण झाली. पावसामुळे कांद्याची रोपे व पीक खराब झाले. टोमॅटोला भाव नाही. डाळिंबाने निराशा केली. सापशिडीच्या
खेळाप्रमाणे शेतकरी पुन्हा खाली घसरला आहे.
- बापू चव्हाण, वरवंडी, ता. देवळा, जि. नाशिक.

देवळा, जि. नाशिक : येथील देवळा- चांदवडसह कसमादे पट्ट्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसाने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित केल्या असल्या, तरी शेतांमधील कांद्याचे रोप व पीक मरू लागले आहे. यामुळे त्याचे प्रमाण विरळ झाले असून, उत्पादनक्षमतेत कमालीची घट होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय चाळींत साठवलेला उन्हाळी कांदाही प्रतिकूल वातावरणामुळे खराब होऊ लागल्याने शेतकरीवर्गात चिंता आहे.

परिसरात महिनाभर पावसाने पाठ फिरवली होती; परंतु पितृपक्ष सुरू झाला आणि पावसाने जो धडाका लावला तो दररोज बरसू लागला. यामुळे एकीकडे पाऊस
पडल्याचा आनंद, तर दुसरीकडे हे असे नुकसान यामुळे शेती करावी तरी कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. थोडे बरे दिवस आले असे वाटत असतानाच
अशी आस्मानी, तर कधी सुलतानी संकटांची मालिका कायम आहे.

पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिके घेता येणे शक्‍य होणार आहे. पण उन्हाळ कांद्यासाठी टाकलेले उळे व पोळ्यादरम्यान लावलेले कांदापीक सडून खराब झाले आहे. याशिवाय जो कांदा आपल्याला पैसा मिळवून देईल अशी आशा होती तो चाळीतील कांदाही आता काही भागात खराब होऊ लागला आहे.

कांद्याला चांगले दिवस आल्याने शेतकऱ्यांनी सध्या कांदापिकावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, या अशा प्रतिकूल स्थितीमुळे कांदा खराब होऊ लागल्याने आगामी
काळात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नवीन कांदा बाजारात भाव खाणार असला, तरी त्याची उत्पादनक्षमता घटणार आहे. यावर
पर्याय म्हणून काहींनी पुन्हा काळे उळे टाकले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या...
‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर...
सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७...सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची...
औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा... अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद...