agriculture news in Marathi,Radhamohan singh says, state governments to go in for decentralised procurement of pulses, oilseeds and cotton, Maharashtra | Agrowon

कडधान्य, तेलबिया, कापसाची विकेंद्रित खरेदी करावी : राधामोहन सिंह
वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

राज्यांनी कडधान्य, तेलबिया आणि कापसाची विकेंद्रित खरेदी करावी, अशा सूचना केल्या आहेत. तसेच केंद्र मागील दोन वर्षांपासून कडधान्याला हमीभावाच्या वर बोनस देत असल्याने कडधान्याचा दर उत्पादनखर्चाच्या दीडपट होतो.
- राधामोहनसिंह, केंद्रीय कृषिमंत्री

नवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना हमीभावाची शाश्वती मिळावी यासाठी कडधान्य, खाद्यतेल आणि कापूस या उत्पादनांची राज्य सरकारांनी विकेंद्रित खरेदी करावी, असे केंद्र सरकराने सर्व राज्यांना लेखी कळविले आहे, आणि केंद्र याविषयीचे विधेयक लवकरच काढेल, अशी माहिती केंद्रिय कृषी व सहकारमंत्री राधामोहनसिंह यांनी राज्यभेत दिली. 

राज्यसभेत शुक्रवारी (ता. २९) प्रश्नोत्तराच्या तासात समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रिय कृषी व सहकारमंत्री राधामोहनसिंह यांनी ही माहिती दिली.

मंत्री सिंह म्हणाले, की याविषयी काही राज्यांकडून आम्हाला सकारात्मक उत्तर मिळाले आहे. मात्र अजून अनेक राज्यांनी याविषयी आपली भूमिका मांडली नाही. सर्व राज्यांनी याविषयी सकारात्मक भूमिका दाखविल्यास केंद्र कडधान्य, तेलबिया आणि कापूस या उत्पादनांच्या विकेंद्रित खरेदीचे विधेयक संसदेत आणेल. तसेच मध्य प्रदेश आणि हरियाना यांसारखी राज्ये शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास त्याचा फरक देत आहे.

केंद्राने अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्रालयांतर्गत किंमत स्थिरीकरण निधीची स्थापना करून मुबलक अन्नधान्याचा साठा केला आहे. बाजारात कडधान्याचे दर हमीभावाच्या खाली गेल्यास केंद्र सरकार किंमत मदत योजनेअंतर्गत राज्यांनी मागणी केल्यास खरेदी करते. तसचे सरकारने मागील दोन वर्षांपासून कडधान्यांसाठी हमीभावाच्या वर बोनस जाहीर केला आहे आणि ही किंमत उत्पादनखर्चाच्या दीडपट आहे, असेही मंत्री सिंह यांनी स्पष्ट केले. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...