agriculture news in marathi,ragistar meeting, vardha, maharashtra | Agrowon

बाजार समितीच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या निबंधकांवर कारवाई : देशमुख
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
वर्धा :  बाजार समितीमध्ये सहायक निबंधक हे पदसिद्ध सदस्य असतात. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहून शासनाच्या योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. मात्र सहायक निबंधक बाजार समितीमधील कोणत्याही बैठकीला हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या सहायक निबंधकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. 
 
हिंगणघाट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी भवन येथे आयोजित सहायक निबंधक व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत श्री. देशमुख बोलत होते. या वेळी विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू उपस्थित होते.
 
या वेळी श्री. देशमुख म्हणाले, की शेतीमाल तारण योजना राबविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला प्रोत्साहित करण्यात यावे. शेतीमालाचे भाव बाजारात पडलेले असताना शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये म्हणून शेतकरी त्यांचा शेतीमाल बाजार समितीमध्ये शेतीमाल तारण योजनेत ठेऊ शकतात.
 
शेतीमालाच्या तत्कालीन बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. यथावकाश वाढलेल्या बाजारभावाचा लाभही नंतर शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहित करावे. तूर खरेदी मध्ये येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी तूर विकणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. 
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ त्रुटी दूर करण्यासाठी सांगावे. तसेच काही कारणाने ऑनलाईन अर्ज न भरू शकलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. 
 
अवसायनात निघालेल्या सहकारी संस्था तत्काळ बंद करण्यासाठी कारवाई सुरू करावी. विदर्भातील सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी अटल पणन योजना राबविण्यात येणार असून, यामध्ये जुन्या भात गिरण्यांचा समावेश करण्यात येईल. तसेच प्रत्येक गावात एक सोसायटी निर्माण करावी. प्रत्येक शेतकरी अशा सोसायटीचा सभासद असला पाहिजे. सहकार क्षेत्रातील अनुभव संस्था उभी करण्यासाठी उपयोगात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...