मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-भाजपमध्ये चर्चा सुरू झाल्याने भाजपला साथ देणाऱ
ताज्या घडामोडी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी झालेल्या पावसानंतर मंगळवारी (ता.२०) पुन्हा अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. मोहोळ, मंगळवेढा, करमाळा, उत्तर सोलापूर तालुक्यात पावसाचा जोर होता. दरम्यान, या पावसाने रब्बी हंगामातील ज्वारीला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी कांदा आणि भाजीपाला पिकाला मात्र मोठा फटका बसला आहे.

सोमवारी पहाटेपासून दिवसभर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. सकाळच्या पावसाच्या हजेरीनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पण मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास पावसाने पुन्हा सुरवात केली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पावसाचा जोर चांगलाच वाढला. पहाटे साडेचार वाजेपर्यंत विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप चालू होती. अचानकपणे बदललेल्या या वातावरणाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ भागात काही ठिकाणी द्राक्ष बागांचा व आंब्याचा मोहर गळून पडला.
सोमवारी सर्वांत जास्त पाऊस माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक परिसरात झाला. या ठिकाणी दोन तासांहून अधिक वेळ पाऊस सुरू होता. पंढरपूर शहरात तुरळक पाऊस झाला. सोलापूर शहरात पावसाने तुरळक हजेरी लावली.
सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापुरात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला. मोहोळला रात्री साडेबाराला पाऊस सुरू झाला. सुमारे तासभर तो पडत होता. करमाळ्यातील पोथरे, केतूर भगातही जोरदार पाऊस झाला.
मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक परिसरातील आठ-दहा गावांमध्ये पावसाळ्यात पडला नव्हता एवढा पाऊस एका रात्रीत झाला. नेमके याच भागात रब्बीचे ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. या ज्वारीला पावसाचा चांगला फायदा होणार असला, तरी या भागातून कांदा, भाजीपाल्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. त्याला मात्र चांगलाच फटका बसला. अनेक शेतकऱ्यांचे काढलेले कांदे जागेवरच खराब होणार आहेत, तर काही पाण्याविना तसेच सोडलेले कांदेही जागेवरच संपणार आहेत. त्याशिवाय भाजीपाला पिकालाही या पावसाचा फटका बसला आहे.
- 1 of 346
- ››