agriculture news in marathi,regaional grapes seminar, nashik, maharashtra | Agrowon

‘बनावट निविष्ठा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार ’
ज्ञानेश उगले
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017
नाशिक  : बोगस खते, बुरशीनाशके, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांची विक्री करणारी व्यक्ती आढळल्यास तत्काळ कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाशी संपर्क साधा. अशा तऱ्हेने बनावट निविष्ठांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करू, असे नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी सांगितले. 
 
नाशिक  : बोगस खते, बुरशीनाशके, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांची विक्री करणारी व्यक्ती आढळल्यास तत्काळ कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाशी संपर्क साधा. अशा तऱ्हेने बनावट निविष्ठांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करू, असे नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी सांगितले. 
 
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे आयोजित विभागीय द्राक्ष चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड अध्यक्षस्थानी होते. संघाच्या मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष कैलास भोसले, संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, ऑल इंडिया ग्रेप्स एक्‍स्पोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, नाशिकचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजय उपाध्याय, डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. आर. जी. सोमकुंवर उपस्थित होते.
 
श्री. झेंडे म्हणाले की, निविष्ठा घेताना पक्‍क्‍या पावतीसह उत्पादनाची अधिकृत माहिती घ्यावी. प्रत्येक उत्पादनाचा शास्त्रोक्त आधार तपासला पाहिजे. शिफारस नसलेली कृषी रसायने वापरून पिकाचे नुकसान होते. त्या सोबतच वेळ व श्रमाचाही अपव्यय होतो. शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातूनच शेतीचा विचार करावा. गुणवत्ता, उत्पादन आणि बाजार या संदर्भात चांगले काम करून समतोल राखता येणे शक्‍य आहे. दिवसरात्र कष्ट करणारा शेतकरी प्रामाणिकपणे व व्यावसायिकतेने शेती करतो. मात्र त्यासोबत प्रत्येक टप्प्यात कायदेविषयक साक्षरता आली तर बाजारातील फसवणुकीवर नियंत्रण बसेल.
 

कैलास भोसले म्हणाले की, राज्य द्राक्ष संघाची प्रयोगशाळा अत्याधुनिक तसेच अद्ययावत आहे. खते, पाणी तसेच पर्णदेठ तपासणी आदी कामे सुरू आहेत. संघाच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्त्वावर उच्च दर्जाच्या जीए, सीपीपीयू, हायड्रोजन सायनामाईड या उत्पादनांचे वितरण होते. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. 

द्राक्ष संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, की जागतिक बाजारात भारतीय द्राक्षांचा ब्रॅँड प्रस्थापित होण्यास अतिशय अनुकूल स्थिती आहे. उत्पादन घेताना १०० टक्के गुणवत्तेचा ध्यास घ्या. एकरी उत्पादन घेताना दहा टनांच्या वर जाऊच नका. डिसेंबर ते एप्रिल इतका काढणीचा कालावधी फक्त भारतीय द्राक्षांनाच मिळतो. ही आपली जमेची बाजू आहे. येत्या काळात उत्पादन घेताना वेलीवर सरासरी ३० घड, एका घडात १०० ते दीडशे मणी, फांदीला किमान १२ ते १५ पाने हे सूत्र द्राक्ष उत्पादकांनी लक्षात ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
 
यावेळी माणिकराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. संघाचे सचिव रवींद्र बोराडे यांनी सूत्रसंचालन केले.
 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...