फळे, भाजीपाला निर्यातीसाठी ‘अपेडा फार्मर कनेक्‍ट’वर नोंद करा

APEDA
APEDA
पुणे : युरोप तसेच इतर देशांमध्ये द्राक्षे, डाळिंब, आंबा व भाजीपाला पिकांच्या निर्यातीकरिता निर्यातक्षम बागांची ग्रेपनेट, अनारनेट, मॅंगोनेट व व्हेजनेटद्वारे नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावेत यासाठी अपेडाने ‘अपेडा फार्मर कनेक्‍ट’ हे मोबाईल अॅप तयार केले आहे. हे अॅप शेतकऱ्यांनी मोबाईलवर डाउनलोड करून त्यावर निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब, आंबा व भाजीपाला पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे शक्‍य नसेल त्यांनी संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे लिखित अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करूनदेण्यात आली आहे. या अॅपवर आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेलच्या साहाय्याने शेतकऱ्यांनी एकदा नोंदणी केल्यास हॉर्टीनेट ट्रेसेबिलीटी सिस्टममधील द्राक्ष, डाळिंब, आंबा ही फळे, भेंडी, कारली, मिरची, वांगी, दुधीभोपळा, शेवगा, गवार इत्यादी भाजीपाला पिकांच्या निर्यातक्षम शेतीची नोंदणी करता येते.त्यासाठी हे मोबाईल अॅप http://apeda.gov.in या अपेडाच्या वेबसाईटवरून किंवा गुगल प्ले स्टोअरमधून उत्पादकांनी आपल्या मोबाईलवरून डाऊनलोड करून घ्यावे.
 
मोबाईल अॅपवरून नोंदणी केल्यास शेतकरी, अर्जदारांना त्यांच्या अर्जाची सद्यःस्थिती कळू शकेल. द्राक्ष व आंबा बागांकरिता नोंदणी १५ सप्टेंबरपासून सुरू झाली असून भाजीपाल्याच्या नोंदणीसाठी वर्षभर सुविधा उपलब्ध राहणार आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निर्यात विभागाचे तंत्र अधिकारी गोंविद हांडे यांनी केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com