सांगली जिल्हा बॅंकेत ७९ कोटींच्या कर्जांना मंजुरी

सांगली जिल्हा बॅंकेत ७९ कोटींच्या कर्जांना मंजुरी
सांगली जिल्हा बॅंकेत ७९ कोटींच्या कर्जांना मंजुरी

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सर्वसाधारण वार्षिक सभा २८ सप्टेंबरला होणार असून, कार्यकारी समितीच्या बैठकीत ७९ कोटी ७२ लाख रुपयांच्या कर्जवाटपास मंजुरी दिल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बॅंकेच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. बॅंकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक प्रतापराव पाटील, उदयसिंह देशमुख, सी. बी. पाटील, गणपती सगरे, विशाल पाटील, बाळासाहेब होनमोरे, श्रद्धा चरापले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा मुदतीत घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे २८ सप्टेंबरला तारीख निश्‍चित केली. बॅंकेच्या वतीने विविध योजना राबवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. समितीच्या बैठकीत शेतीविषयक ३० कोटी ६७ लाखांच्या कर्जांना मंजुरी दिली. शेतकरी, बचतगट, पगारदार नोकर, वाहन खरेदीदार, बॅंक सेवक, सहकारी संस्था अशा एकूण १४१२ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. बिगरशेतीच्या ४९ कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. साखर कारखाना एक (१४.८१ कोटी), सूतगिरणी एक (१.०५ कोटी), पगारदार नोकर (१.५० कोटी), शेतकरी घरबांधणी (७०.४० कोटी), वाहन खरेदी (८७ लाख), बॅंक सेवक (५.९८ कोटी) याप्रमाणे एकूण ७९ कोटी ७२ लाख रुपयांच्या कर्जवाटपास मंजुरी दिली आहे.''

बदलाचा निर्णय नेत्यांकडे : अध्यक्ष व उपाध्यक्ष बदलाची मागणी संचालकांनी केली आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय आघाडीतील नेते मंडळी घेतील. बॅंकेच्या हिताला कोणताही बाधा येणार नाही, याची दक्षता संचालकांनी घेतली असल्याचे संचालक प्रतापराव पाटील यांनी सांगितले.

मंजुरी मिळेलेले कर्जाचे विषय आणि रक्कम द्राक्षबाग उभारणी व ठिबक सिंचन - १२.१५ कोटी, मध्यम व दीर्घ मुदत कर्जे -१४.८१ कोटी, विकास संस्था फर्निचर -१८ लाख, शेतजमीन खरेदी- ७.८२ लाख, कुक्कुटपालन -४६.४० लाख, स्वयंसाह्यता बचत गट - १.१३ कोटी, जे.एल.जी गट -१.९५ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com