सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने पाणी

सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने पाणी
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने पाणी

सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. दरम्यान, टंचाई वाढतच असून सध्या १८३ गावे आणि एक हजार २७४ वाड्या-वस्त्यांमधील चार लाख १८ हजार २५५ लोकांना तब्बल २१५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाई सुरू आहे. डिसेंबर महिन्यात ४१ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. दरम्यान, जानेवारीपासून टँकरच्या संख्येने दुपटीने वाढ झाली असून मार्च, एप्रिलमध्ये वाढीचा चढता क्रम आहे. सध्या १८३ गावे आणि एक हजार २७४ वड्या-वस्त्यांना २१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक जत तालुक्यातील ९६ गावे आणि ७१६ वाड्या, आटपाडी १४ गावे आणि २२४ वाड्या, कवठेमहांकाळ ३० आणि १४१ वाड्या, खानापूर १७ गावे आणि ४ वाड्या, तासगाव १८ गावे १५१ आणि मिरज ८ गावे ३८ वाड्या अशा १८३ गावे आणि एक हजार २७४ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

चार लाख लोकांना टँकरने पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. सध्या जतमधील दोन लाख २३ हजार १३१, कवठेमहांकाळ ४७ हजार ६६१, खानापूर २६ हजार १९७, आटपाडी ४७ हजार ५४५, तासगाव ४५ हजार ५४९, मिरज २७ हजार ९७२ अशा चार लाख १८ हजार २५५ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे.

जत तालुक्यात तीव्र टंचाई दरम्यान, चारा आणि पाण्याची टंचाई जत तालुक्यात सर्वाधिक आहे. जत तालुक्यातील १२३ गावांपैकी तब्बल ९६ गावे आणि ७१६ वाड्या वस्त्यांमधील सुमारे सव्वादोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये जत पूर्वभागातील बहुतांशी गावांचा समावेश आहे. जतेच्या पश्चिम भागात म्हैसाळ योजेनेचे पाणी आले आहे. तर पूर्व भाग कोरडाच आहे. यामुळेच सध्या या भागातील सर्व गावात पाणीटंचाई गंभीर झाली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com