सांगली महापालिका निवडणुकीत भाजपची बाजी

सांगली निवडणूक निकाल जाहिर
सांगली निवडणूक निकाल जाहिर

सांगली  ः सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ४१ जागांवर विजय मिळवला. शेवटच्या क्षणापर्यंत लंबक भाजप की काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी असा राहिला. १९९८ पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसची सत्ता अखेर उलटवून टाकत भाजप सत्तेत आला.

या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे ३५, स्वाभिमानी विकास आघाडीकडे १, तर अपक्षकडे १ जागा असे बलाबल राहिले. आपसह विविध पक्षांचा समावेश असलेल्या लोकशाही आघाडीचे ४५१ उमेदवार महापालिकेच्या निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीच्या सकाळच्या टप्प्यात काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली. सांगली आणि मिरज या दोन्ही ठिकाणी हक्काचे प्रभाग जिंकताना भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रभागातही घुसखोरी करून बहुमत पटकावले.

या निवडणुकीत किशोर जामदार, इद्रिस नायकवडी, विवेक कांबळे या तीन माजी महापौरांना मतदारांनी नाकारले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. दोन्ही पक्षांनी सामंजस्य दाखवित निवडणूकपूर्व आघाडीही केली होती. पण अखेर मतदारांनी भाजपच्या पारड्यात कौल दिला. सांगली, मिरज, कुपवाड तीनही शहरांत चित्रातही शिवसेना दिसेना झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com