agriculture news in marathi,seed production planning,nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात महाबीज करणार ३३८४ हेक्‍टरवर बीजोत्पादन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

नगर  : महाबीजतर्फे जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत ३३८४ हेक्‍टर क्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यात सर्वाधिक ३१५८ हेक्‍टर क्षेत्र सोयाबीनचे असेल. महाबीजतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. पायाभूत बियाणे पुरवठा करून नंतर त्याची २५ टक्के जादा दराने खरेदी केली जाते.

नगर  : महाबीजतर्फे जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत ३३८४ हेक्‍टर क्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यात सर्वाधिक ३१५८ हेक्‍टर क्षेत्र सोयाबीनचे असेल. महाबीजतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. पायाभूत बियाणे पुरवठा करून नंतर त्याची २५ टक्के जादा दराने खरेदी केली जाते.

महाबीजतर्फे दरवर्षी बिजोत्पादन कार्यक्रम राबवला जातो. यंदाही हा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी महाबीजतर्फे पायाभूत बियाणे विकत दिले जाते. एका गावात साधारण २५ हेक्‍टर क्षेत्रापर्यंत बियाणे पेरणी होते. पेरणीनंतर बीज प्रमाणिकरण अधिकाऱ्यांकडून नोंदणी करत तपासणी केली जाते. डिसेंबर, जानेवारी महिन्यातील सरासरी दर ग्राह्य धरत त्याच्या वाढीव २५ टक्के दराने महाबीज हे बियाणे खरेदी करते. शिवाय शेतकऱ्यांना दरावर बोनसही दिला जातो.

बिजोत्पादनासाठी विलीनीकरणानुसार पेरणी केली जाते. त्यासाठी तुरीच्या अन्य वाणाचे १०० मीटरचे अंतर तर सोयाबीनचे तीन मीटरचे अंतर असणे गरजेचे आहे. यंदा जिल्ह्यातील नगर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या सात तालुक्‍यांत ३३८४ हेक्‍टर क्षेत्रावर बिजोत्पादन घेतले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी तालुका अथवा जिल्हा कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सी. के. देशमुख, सुनील दौंड यांनी केले आहे.
 

पीकनिहाय क्षेत्र
सोयाबीन ३१५८
तूर  १२६
ज्यूट ५०
बाजरी ५०

 

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...