agriculture news in Marathi,sharad pawar says sugar mills should give priority to ethanol , Maharashtra | Agrowon

ऊस उत्पादकता वाढ, इथेनॉलला कारखान्यांनी प्राधान्य द्यावे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संसार नीटनेटका चालण्यासाठी उसाची उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न साखर कारखान्यांनी करावेत. तसेच, येत्या दोन वर्षांत सर्व कारखान्यांनी इथेनॉलचे प्रकल्प उभारावेत, अशा महत्त्वपूर्ण सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांना केल्या. 

पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संसार नीटनेटका चालण्यासाठी उसाची उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न साखर कारखान्यांनी करावेत. तसेच, येत्या दोन वर्षांत सर्व कारखान्यांनी इथेनॉलचे प्रकल्प उभारावेत, अशा महत्त्वपूर्ण सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांना केल्या. 

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या ६२ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहितेपाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, इस्माचे अध्यक्ष रोहित पवार, दिलीपराव देशमुख, साखर आयुक्त संभाजी कडूपाटील, संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावरकर व श्रीराम शेटे तसेच इतर मान्यवर होते. संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

श्री. पवार म्हणाले, की केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून इथेनॉलसाठी चांगले धोरण तयार करण्यात यश आले आहे. इथेनॉल खरेदीबाबत ऑईल कंपन्यांकडून काही अडचणी येत आहेत. मी त्यांच्याशीही बोलनेच पण आधी राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी इथेनॉलचे प्रकल्प उभारून दोन वर्षांत १०० टक्के काम पूर्ण करावे. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रांची ऑर्डर द्यावी लागेल. यंत्रांचा पुरवठा एकदम होणार नाही. मात्र, गप्प बसला तर नुकसान होईल. थेट उसाच्या रसापासून इथेनॉल परवडणारे नसले तरी मळीपासून इथेनॉल परवडते. त्यामुळे आता इथेनॉल, साखर आणि सहवीज अशा तीन बाबींवर केंद्रीत असलेल्या कारखानदारीचा विकास झाला तरच भविष्यात कारखानदारीचे चित्र चांगले राहील.

हुमणीमुळे राज्याचे २० हजार हेक्टरपेक्षाही जास्त ऊस क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखानदारांनी आता कृषी खात्याच्या मदतीने गावनिहाय बैठका सुरू कराव्यात, अशीही सूचना श्री. पवार यांनी केली.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रभावी प्रतिनिधीत्व करणाऱ्या साखर संघाच्या वार्षिक सभेला साखर आयुक्त वगळता राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने कारखाना प्रतिनिधींनी आश्चर्य व्यक्त केले. 

पंतप्रधानांना पाच पत्रे
राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्र सरकारने आतापर्यंत जाहीर केलेल्या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, "साखर कारखान्यांच्या समस्यांवर श्री. पवार यांच्याकडून पंतप्रधानांना पाच पत्रे लिहिण्यात आली. त्यामुळे पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी दिल्लीत श्री. पवार यांच्या निवासस्थानी येवून माहिती घेतली. त्यानंतर पॅकेज जाहीर झाले. त्यात साखरेचा बाजारभाव  २९ रुपये प्रतिकिलोवर ठेवण्याचा निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. केंद्राप्रमाणेच आता राज्य शासनाकडून पॅकेज मिळवण्याचा प्रयत्न साखर संघाने करण्याची आवश्यकता आहे."

हुमणीमुळे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर हुमणीचे मोठे संकट आलेले आहे. त्यामुळे ३०-४० टक्के नुकसान होणार आहे, असे सांगत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्हीएसआयच्या शास्त्रज्ञांना माहिती देण्याची सूचना साखर संघाच्या सभेत केली. त्यावर कीटकशास्त्रज्ञ डॉ. आर. पी. यादव यांनी काही भागात हुमणीमुळे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होणार असल्याचे स्पष्ट केले. "हुमणीसाठी रासायनिक उपायांबरोबरच जैविक तंत्राचा अवलंब केल्याशिवाय नियंत्रणाशिवाय पर्याय नाही. हुमणीच्या एकूण ३०० जाती असल्यातरी राज्यात दोन प्रमुख जातींचा प्रादुर्भाव आहे. अवर्षण, पाण्याचा ताण यामुळे हुमणी वाढली असून पुढील तीन हंगाम लागोपाठ सामुदायिक उपाय सर्व कारखान्यांनी केले तरच हुमणी थांबेल," असेही डॉ. यादव म्हणाले. 

शरद पवार म्हणाले

  • ऊस तोडणी कामगारांबाबत मी स्वतः २०२० पर्यंत करार केला. मात्र, कराराची मदत संपण्याआधीच पुन्हा प्रश्न तयार झाला आहे. करार पाळण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंची असते.
  • साखरेचा साठा कमी होत नाही तोपर्यंत कारखान्यांच्या अडचणी संपणार नाहीत.त्यामुळेच निर्यातवाढीसाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील.
  • केंद्र सरकारने साखरउद्योगासाठी आऊट ऑफ द वे जावून काही बाबतीत मदत केली आहे. त्यात निर्यातीचा दंडक आपल्यावर घातला आहे. मात्र, केंद्राच्या मदतीचा लाभ घेण्यासाठी निर्यात करावी लागेल.
  • दिलीप वळसेपाटील यांच्या अध्यक्षपदाच्या रुपाने राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांचे नेतृत्व सध्या महाराष्ट्र करतो आहे. खासगी कारखान्यांच्या अध्यक्षपदासाठी देखील रोहीत पवार यांची निवड झाली. यावर श्री.पवार म्हणाले देशाच्या संपूर्ण साखर उद्योगाचे नेतृत्व करण्याची संधी प्रथमच महाराष्ट्राला मिळाली आहे.

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...