agriculture news in marathi,silk basal maraket start at jalna, maharashtra | Agrowon

रेशीम कोष उत्पादकांना अनुदानासाठी प्रयत्न : राज्यमंत्री खोतकर
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 एप्रिल 2018

जालना : राज्यातील रेशीम उत्पादकांची बाजारपेठेची अडचण सोडविण्याचा प्रयत्न जालन्यातील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेच्या माध्यमातून केला जाईल. रेशीम कोष उत्पादकांना प्रतिकिलोमागे ५० रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

जालना : राज्यातील रेशीम उत्पादकांची बाजारपेठेची अडचण सोडविण्याचा प्रयत्न जालन्यातील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेच्या माध्यमातून केला जाईल. रेशीम कोष उत्पादकांना प्रतिकिलोमागे ५० रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

जालना येथील बाजार समितीच्या आवारात राज्यातील पहिली प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेचे शनिवारी (ता. २१) उद्‌घाटन झाले. या वेळी श्री. खोतकर बोलत होते. माजी मंत्री व आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, वस्त्रोद्योग सचिव अतुल पाटणी, रामनगरम येथील मार्केटचे उपसंचालक जे एन. मुन्शी, रेशीम विभागाचे मराठवाड्याचे सहाय्यक संचालक दिलीप हाके, भास्कर आंबेकर या वेळी उपस्थित होते.

श्री. खोतकर म्हणाले, की रेशीमच्या बाजारपेठेसाठी जालन्यात जागा निर्धारीत करण्यात आली आहे. सहा कोटींचा निधीही प्राप्त झाला आहे. लवकरच बाजारपेठेचे काम सुरू करण्यात येईल. या बाजापेठेत कोष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न करू नये. मराठवाड्यात चॉकी प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. रेशीम उद्योगात मराठवाड्याने संधीचे केलेले सोनं पाहता पुढील पाच वर्षांत रामनगरच्या धर्तीवर अद्ययावत बाजारपेठ जालना येथे कार्यान्वीत केली जाईल.

राजेश टोपे म्हणाले, की बाजारपेठ सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न मार्गी लागतील. शेतकऱ्यांनी दर्जेदार रेशीम उत्पादन घ्यावे. रेशीम विभागाने दहा शेतकऱ्यांच्या गटालाही नरेगाअंतर्गत मान्यता द्यावी.

जालन्यातील रेशीम कोष बाजारपेठेत पहिल्याच दिवशी मराठवाडा, विदर्भातील बुलडाणा, अकोलासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील जवळपास एक हजार शेतकरी रेशीम कोष घेऊन बाजारपेठेत दाखल झाले. दुपारपर्यंत जवळपास पाच हजार किलो रेशीम कोष बाजारपेठेत आणले गेले. मान्यवरांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील पाली येथील रामेश्‍वर राउत यांनी आणलेल्या रेशीम कोषाची मोजणी करण्यात आल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.

रेशीम कोष बाजारपेठ तूर्त मॅन्युअली कार्यान्वित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची नोंदणी, त्यांना हॉल उपलब्ध करून देणे, लिलाव करणे, जो जास्त बोली बोलेल त्याला माल देणे अशी पद्धत अवलंबली गेली आहे. पहिल्याच दिवशी कर्नाटकासह महाराष्ट्रातील जवळपास चौदा व्यापारी बाजारपेठेतील रेशीम कोष खरेदी प्रक्रियेत सहभागी झाल्याची माहितीही रेशीम विभागाने दिली.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...