पाच जिल्ह्यांत १ लाख ९१ हजार मृदा नमुने तपासणीचा लक्ष्यांक

मृदा आरोग्य तपासणी
मृदा आरोग्य तपासणी
परभणी  ः जमीन मृदा आरोग्यपत्रिका योजनेअंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीतून १ लाख ९१ हजार ९३८ मृदा नमुने काढून तपासणी करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करावा, यासाठी या योजनेअंतर्गत त्यांना जमीन आरोग्यपत्रिका वितरित केल्या जात आहेत.
 
यंदापासून जमीन आरोग्यपत्रिकेसाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. जमीन आरोग्यपत्रिका योजनेअंतर्गत २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांसाठी एकत्रित लातूर कृषी विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ५ जिल्ह्यांमधील ३ लाख ४७ हजार ४७१ मृदा नमुने घेण्याचा तपासणी करण्याचा लक्ष्यांक दिलेला होता.
 
२०१७-१८ मध्ये १ लाख ५१ हजार ५३३ मृदा नमुने घेण्यात आले. यामध्ये परभणी जिल्ह्यातील २३,२३१, हिंगोली जिल्ह्यातील १९,३२६, नांदेड जिल्ह्यातील ४६,३५५, लातूर जिल्ह्यातील ३२,७४५, उस्मानाबाद जिल्ह्यतील २९,८७६ मृदा नमुन्यांचा समावेश आहे. मृदा नमुन्यांच्या तपासणीनंतर शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या.
 
यंदा या पाच जिल्ह्यांमध्ये दोन वर्षांच्या एकत्रित लक्ष्यांकातून शिल्लक राहिलेले १ लाख ९१ हजार ९३८ मृदा नमुने घेण्यात येणार आहेत. तपासणीनंतर शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत.
 
२०१०-११ च्या कृषी गणनेनुसार परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांत ५ लाख ६८ हजार २६६ हेक्‍टर क्षेत्र लागवडी योग्य आहे. त्यापैकी ५ लाख ५८ हजार ६४१ हेक्‍टर जिरायती, तर ९ हजार ६१७ हेक्‍टर बागायती क्षेत्र आहे. जिरायती क्षेत्रातून प्रति १० हेक्‍टरकरिता एक आणि बागायती क्षेत्रातून २.५० हेक्‍टरकरिता एक याप्रमाणे यंदा
परभणी जिल्ह्यातील ५१३ गावांतील ३६ हजार ४८१ मृदा नमुने आणि हिंगोली जिल्ह्यातील ३६६ गावांतील १७ हजार ९८४ मृदा नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे.
 
जमीन आरोग्यपत्रिकेसाठी संबंधित शेतकऱ्यांचा आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. मृदा नमुने काढण्यात आलेल्या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांच्या जातींचा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, सर्वसाधारण असे संवर्ग मृदा नमुना चिठ्ठीवर नमूद करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
 
२०१८-१९ मधील जिल्हानिहाय मृदा नमुने तपासणी लक्ष्यांक
 जिल्हा मृदा नमुने संख्या
 परभणी ३६,४८१
 हिंगोली १७,९८४
 नांदेड ६२,२६३
लातूर ४१,३३५
 उस्मानाबाद ३३,८७६.

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com