तीन जिल्ह्यांत एक लाखांवर मृदा नमुने परीक्षणाचे उद्दिष्ट

माती नमुने तपासणी
माती नमुने तपासणी

नांदेड : जमीन मृदा आरोग्य पत्रिका योजनेअंतर्गंत २०१८-१९ या वर्षासाठी नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीतून १ लाख १६ हजार ७३० हजार माती नमुने घेत त्याच्या परीक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी १ लाख १३ हजार २४४ माती नमुने तपासणीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ९४ हजार २६६ माती नमुन्यांचे परीक्षण करून विश्लेषण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ५२ हजार ३५२ माती नमुने परीक्षणाचे उद्दिष्ट होते. परंतु, प्रत्यक्षात ४६ हजार ३५५ माती नमुन्यांची तपासणी करून विश्लेषण करण्यात आले. २०१८-१९ या वर्षासाठी ६२ हजार २६५ माती नमुन्यांचे परीक्षण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

यामध्ये नांदेड तालुक्यासाठी ३१९५, अर्धापूर तालुक्यासाठी २२००, मुदखेड तालुक्यासाठी २५६४, कंधार तालुक्यासाठी ४८५०, लोहा तालुक्यासाठी ६५५२, देगलूर तालुक्यासाठी ३९१९, मुखेड तालुक्यासाठी ७०५८, बिलोली तालुक्यासाठी ३५०९, नायगांव तालुक्यासाठी ३५५९, धर्माबाद तालुक्यासाठी १५२१, किनवट तालुक्यासाठी ५३६०, माहूर तालुक्यासाठी २३६२, भोकर तालुक्यासाठी २९५९, उमरी तालुक्यासाठी २१४६, हदगाव तालुक्यासाठी ६५६७, हिमायतनगर तालुक्यासाठी ३९३७ माती नमुने तपासणी उद्दिष्टाचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यात मार्चअखेर ३३५ गावांतील २३ हजार २३१ माती नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी २६६ गावांतील १९ हजार ८२९ नमुन्याचे विश्लेषण करून ९५ हजार १६७ मृद आरोग्य पत्रिका तयार करण्यात आल्या. त्यापैकी ७१ हजार ३७५ मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. यंदा ३६ हजार ४८१ माती नमुने तपासणीचे उद्दिष्ट आहे.

यामध्ये परभणी तालुक्यातील ५६४२ माती नमुने घेण्यात येणार आहेत. जिंतूर तालुक्यातून ७४६३, सेलू तालुक्यातून  ३६२५, मानवत तालुक्यातून २६२२, पाथरी तालुक्यातून २२०७, सोनपेठ तालुक्यातून २००३, गंगाखेड तालुक्यातून ४८२७, पालम तालुक्यातून २३,७८३, पूर्णा तालुक्यातून ४३०९ माती नमुने घेण्यात येणार आहेत.

गतवर्षी हिंगोली जिल्ह्यातील ४२६ गावांतील २५ हजार १२२ माती नमुने घेण्याचे उद्दिष्ट असताना ३९ गावांतील २४ हजार ६८० माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ८० हजार ६८८ मृदा आरोग्य पत्रिका तयार करण्यात आल्या. त्यापैकी ७३ हजार ५८६ आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या. यंदा ३६६ गावांतील १७ हजार ९८४ माती नमुने घेण्याचे उद्दिष्ट आहे.

यामध्ये हिंगोली तालुक्यातून ४५३३ माती नमुने घेण्यात येणार आहेत. कळमनुरी तालुक्यातून ३९११, वसतम तालुक्यातून २८८२, औंढा नागनाथ तालुक्यातून २८९३, सेनगांव तालुक्यातून ३७६० मृद नमुने घेण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com