agriculture news in marathi,soyabean seed stock finished,akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात अनुदानित सोयाबीन बियाणे मिळेना
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

अकोला जिल्ह्यासाठी महाबीजकडे ३१ हजार क्विंटल सोयाबीन बियाणाची मागणी होती. वास्तवात ३६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले गेले. सोयाबीन लागवडीकडे कल वाढत असल्याने उपलब्ध करून दिलेले बियाणे संपले अाहे.
-रामचंद्र नाके, विपणन महाव्यवस्थापक, महाबीज, अकोला.

अकोला  ः पाऊस लांबत असल्याने इतर पिकांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पेरणीला प्राधान्य देत अाहेत. यामुळे महाबीजने हंगामासाठी पुरविलेले अनुदानित सोयाबीन बियाणे पूर्णपणे संपल्याचा दावा केला अाहे. बाजारपेठेत बियाणे नसल्याने अनुदानाचे परमिट मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांच्या पदरी सध्या निराशा येत अाहे. बियाण्याबाबत बाजारपेठेत अोरड सुरू झाली अाहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनची लागवड सुमारे दोन लाख १५ हजार हेक्टरवर होईल, असे नियोजन कृषी विभागाने केले होते. यासाठी महाबीजसह खासगी कंपन्यांकडून बियाणे पुरविण्याबाबत नियोजन करण्यात अाले. महाबीजकडे ३१ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात अाली होती. हंगामात पेरणी क्षेत्र वाढू शकते हे पाहता महाबीजने अाणखी पाच हजार क्विंटलने पुरवठा वाढवित अकोला जिल्ह्यात ३६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिल्याचे सांगितले जाते.    

पाऊस लांबत असल्याने पेरण्यांना विलंब होऊ लागला अाहे. शिवाय गेल्या हंगामात बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचा अनुभव पाहता शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवडीकडे वळत अाहेत. परिणामी, बाजारातील महाबीजचे सोयाबीन बियाणे संपले अाहे. ज्यांना ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत अनुदानित बियाण्यासाठी परमिट देण्यात अाले अशांनी हे परमिट मिळाल्यापासून तीन दिवस किंवा बाजारात बियाणे उपलब्ध झाल्यापासून तीन दिवसांत बियाणे उचलणे गरजेचे असते. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी या काळात बियाणे उचलले नाही.

परिणामी, बाजारातील सोयाबीन बियाणे संपले अाहे. एेनवेळी अाता बियाणे उपलब्ध करणे शक्य नसल्याने तसेच वाढीव बियाणे साठा उपलब्ध होण्याची कुठलीही शाश्वती नसल्याचे महाबीजच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. शेतकऱ्यांना अाता विनाअनुदानित किमतीचे बियाणे घेणे क्रमप्राप्त झाले अाहे.  बाजारपेठेत विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे प्रति बॅग १९०० रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात अाहे. शेतकऱ्यांना हे बियाणे घ्यावे लागत अाहे.
 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...