agriculture news in marathi,Soyapark will be built in latur, maharashtra | Agrowon

लातूरमध्ये सोया पार्क उभारणार : सुभाष देसाई
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

लातूर : लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे वाढते क्षेत्र, वाढते उत्पादन, बाजारपेठ व उद्योग लक्षात घेता येथील एमआयडीसीत क्लस्टर डेव्हल्पमेंट अंतर्गत सोया पार्क उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील; तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात फटाका क्लस्टर निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली.

शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्ताने गुरुवारी (ता.२८) श्री. देसाई येथे आले होते. त्यांनी येथे एमआयडीसीतील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच एमआयडीसीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर : लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे वाढते क्षेत्र, वाढते उत्पादन, बाजारपेठ व उद्योग लक्षात घेता येथील एमआयडीसीत क्लस्टर डेव्हल्पमेंट अंतर्गत सोया पार्क उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील; तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात फटाका क्लस्टर निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली.

शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्ताने गुरुवारी (ता.२८) श्री. देसाई येथे आले होते. त्यांनी येथे एमआयडीसीतील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच एमआयडीसीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन व क्षेत्र वाढत आहे. येथे सोयाबीनची मोठी बाजारपेठ आहे. सोयाबीनपासून तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्याही येथे आहेत. येथे सोयाबीनपासून उपपदार्थ तयार करण्याला मोठा वाव आहे. त्यात सोया बिस्कीट, सोया मिल्क, सोया चिज, सोया पनीर, सोया सॉस, जनावराचे खाद्य असे अनेक उद्योग येथे उभारले जाऊ शकतात. हे लक्षात घेऊन टेक्स्टॉईल पार्कच्या धरतीवर येथे सोया पार्क उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, याकरिता उद्योजकांनी पुढे यावे. या पार्ककरिता जमीन उपलब्ध करून दिली जाईल. तसेच ८० टक्के अनुदानावर त्याकरिता लागणारे साहित्यही उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.

येथील अतिरिक्त एमआयडीसी टप्पा दोन, लातूर विमानतळ, घरणी येथील भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावले जातील. तसेच अहमदपूर व उदगीर येथे नवीन एमआयडीसीसाठी जागा घेऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाईल. येथील एमआयडीसीअंतर्गत रस्त्याची दुरुस्तीही लवकर करण्यात येईल, अशी माहिती श्री. देसाई यांनी या वेळी दिली.

या वेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी महेश मेघमाळे यांनी विभागाची माहिती दिली. यात त्यांनी येथे सोया पार्क होऊ शकते ही संकल्पना मांडली. श्री. देसाई यांनी ही संकल्पना उचलून धरत त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन उद्योजकांना दिले. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...