agriculture news in marathi,Start of sowing kharif in Pune division | Agrowon

पुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

पुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झाला आहे. सध्या अनेक भागांत ढगाळ हवामान असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात केली आहे. विभागातील नगर आणि सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४२८० हेक्‍टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले

पुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही भागांत पाऊस झाला आहे. सध्या अनेक भागांत ढगाळ हवामान असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात केली आहे. विभागातील नगर आणि सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४२८० हेक्‍टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले

गेल्या आठवड्यात पावसाचा काही प्रमाणात खंड पडल्याने पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. विभागात काही भागांत उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी लागवड तसेच तूर, मूग, उडीद पिकांची पेरणी करण्यास सुरवात केली आहे. विभागात खरिपातील सरासरी क्षेत्र उसासह एकूण १२ लाख दोन हजार ७० हेक्‍टर आहे. उसाशिवाय एकूण सात लाख ८८ हजार ४८० हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४२८० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

विभागातील नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र चार लाख ७८ हजार ६४० हेक्‍टर आहे. त्यापैकी १७७० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात ७१ हेक्‍टरवर भात रोपांची पुनर्लागवड झालेली आहे. तसेच राहुरी तालुक्‍यामध्ये कापूस पिकाची १७०० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

सध्या खरिपातील पिकांच्या पेरणीसाठी चांगल्या पावसाची आवश्‍यकता आहे. पुणे जिल्ह्यात भात व नाचणी रोपवाटिका तयार करण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात पेरणीसाठी चांगल्या पावसाची आवश्‍यकता आहे. सोलापूर जिल्हयामध्ये खरिपाचे सरासरी क्षेत्र ७९ हजार २० हेक्‍टर असून त्यापैकी २ हजार ५१० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी तीन टक्के पेरणी झाली आहे. अक्कलकोट तालुक्‍यात तूर, मूग व उडीद पिकांच्या काही प्रमाणात पेरणीस सुरवात झाली आहे.

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
 जुन्नरला खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून, तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आदिवासी भागातील भात मुख्य पीक असून, सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रापैकी २५० हेक्टर क्षेत्रात रोपवाटिकेत धूळवाफेवर भातरोपे तयार करण्यात आली आहेत. या रोपांना पावसाची आवश्यकता आहे.

पाणी उपलब्ध असलेले शेतकरी पाणी देऊन रोपे वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. भात लागवडीसाठी मात्र मोठ्या पावसाची गरज आहे. कृषी विभागाने जुन्नर मंडलातील केळी, माणकेश्वर, चावंड, खडकुंबे व ओतूर मंडळ विभागांतील तळेरान, खिरेश्वर, कोपरे, मांडवे या गावांतील सुमारे ५० हेक्टर क्षेत्रात भातपीक प्रात्यक्षिक घेतले असून, येथील भात रोपवाटिकांसाठी सहभागी शेतकऱ्यांना भात बियाणे पुरविण्यात आले आहे.

तालुक्यात सुमारे २६० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात येणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे पुरविण्यात आले आहे, असे सहायक तालुका कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...