agriculture news in marathi,subsidy for onion farmers, aurangabad, maharashtra | Agrowon

औरंगाबादमधील कांदा उत्पादकांसाठी २३ लाखांचे अनुदान मंजूर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुलै ते ऑगस्ट २०१६ दरम्यान कांद्याची विक्री केलेल्या ६३२ शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपयांप्रमाणे अनुदान मंजूर झाले असून त्याची रक्‍कम २३ लाख रुपये आहे. 
 
औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुलै ते ऑगस्ट २०१६ दरम्यान कांद्याची विक्री केलेल्या ६३२ शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपयांप्रमाणे अनुदान मंजूर झाले असून त्याची रक्‍कम २३ लाख रुपये आहे. 
 
दोन वर्षांपासून कांद्याला अपेक्षित भाव मिळालेला नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने भरपाई देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, बाजार समितीमध्ये जुलै व ऑगस्ट २०१६ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना, तसेच अनुदानासाठी प्रस्ताव पाठविलेल्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिक्विंटल शंभर रुपये अनुदान मंजूर केले आहे. एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोनशे क्विंटलसाठी हे अनुदान दिले जाणार आहे.
 
औरंगाबाद बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदानापोटी २३ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. बाजार समितीमध्ये २४ हजार क्विंटल कांद्यांची आवक झाली होती. अनुदानासाठी ६३२ शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. यापैकी ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्‍कम वर्ग करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांचे अनुदान जमा करण्यात आलेले नाही.
 
अनुदानासाठी अर्जात राष्ट्रीयीकृत बॅंकेचे खाते आवश्‍यक होते. अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंक, शेड्यूल्ड बॅंकेचे खाते क्रमांक दिले; तसेच काही शेतकऱ्यांकडून बॅंकेचा आयएफसी कोड चुकीचा टाकल्याने सदर रक्‍कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही. या प्रकरणातील अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांनी बाजार समिती किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...