agriculture news in marathi,sugarcane parishad at jaysingpur, kolhapur, maharashtra | Agrowon

‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना किफायतशीर भाव मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे होणार आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथे संघटनेच्या वतीने झालेल्या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. येथून पुढे एक महिना या परिषदेच्या निमित्ताने विविध ठिकाणी मेळावे घेऊन परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले.

कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना किफायतशीर भाव मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे होणार आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथे संघटनेच्या वतीने झालेल्या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. येथून पुढे एक महिना या परिषदेच्या निमित्ताने विविध ठिकाणी मेळावे घेऊन परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले.

श्री. शेट्टी यांनी या वेळी सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका केली. ``दुष्काळाच्या नावाखाली भाजपने ३० हजार कोटींचा कर जमवला. राज्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज केवळ १४ हजार कोटींचे आहे. भाजपने शेतकऱ्यांना फसविण्याचा उद्योग केला. इथेनॉल ३० रुपये प्रतिलिटर मिळत असताना ९२ रुपयांचे पेट्रोल हवेच कशाला? शर्मा कृषी आयोगाने एफआरपीच्या कायद्यात दुरुस्ती करून साडेनऊ टक्के उताऱ्यावरुन दहा टक्‍क्‍यांवर आणली आहे. यामुळे वरच्या खिशात दोनशे रुपये टाकायचे आणि खालच्या खिशातून १९२ रुपये काढून घ्यायचे असा प्रकार झाला आहे. लोकसभेत मंजुरी न घेताच ही बेकायदा दुरुस्ती केली. या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करू``, असे खासदार शेट्टी म्हणाले. यंदाचा संभाव्य साखर हंगाम, गेल्या वर्षभरातील स्थिती, सरकारची भूमिका याचा अभ्यास करून परिषदेत दर मागणीची घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी सावकार मादनाईक, जालिंदर पाटील, भगवान काटे, सयाजी मोरे, विठ्ठल मोरे, राजेंद्र गड्डाण्णावर, अण्णासाहेब चौगुले, विकास देशमुख, सागर संभुशेट्टे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक शैलेश चौगुले, संजय बेले, अजित पवार, रामचंद्र शिंदे, सरिता भवरे, सविता ठोमके, सुवर्णा अपराज, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...