जादा दरासाठी कर्नाटकमधील कारखान्यांना ऊसपुरवठा

या सर्व परिस्थितीचा विचार करता आम्ही आमच्या संघटनेमार्फत तातडीने कर्नाटकातील कारखान्यांशी संपर्क साधून त्यांच्यासमवेत दराबाबत चर्चा केली आहे. त्यांनी पहिला हप्ता ३००० रुपये देण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस दिल्यास २७०० रुपयांवर दर मिळणार नसल्याने आम्ही आमच्या सभासदांना कर्नाटकातील कारखान्यांना ऊस देण्यासाठी प्रवृत्त केले आहे. - मदन देशपांडे, संघटन मंत्री, भारतीय किसान संघ
ऊस गाळप हंगाम
ऊस गाळप हंगाम
कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी एफआरपी अधिक २०० रुपये अशा ऊसदरावर तोडगा काढला आहे. पण गडहिंग्लज परिसरातील कारखान्यांची रिकव्हरी कमी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात प्रति टन २७०० रुपयापर्यंतची रक्कम पडणार आहे. यामुळे ऊस उत्पादक हवालदिल झाले आहेत. कर्नाटकातील कारखान्यांनी प्रति टन ३००० रुपयांपर्यंतची रक्कम देण्याची तयारी दाखविली आहे. यामुळे ऊस उत्पादकांनी कर्नाटकातील कारखान्यांशी संपर्क साधून या कारखान्यांना ऊस देण्याची तयारी दर्शविली आहे. या भागातील शेतकरी संघटनांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे.
 
कोल्हापुरात निघालेल्या तोडग्यानुसार रिकव्हरीनुसार वेगवेगळी उचल मिळणार आहे. यामध्ये गडहिंग्लज कारखान्याची पहिली उचल २६३८, आजऱ्याची २५३०, हेमरसची २७९३, इकोकेन २६८० रुपये मिळणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांचा दर मात्र सरासरी ३००० ते ३१०० रुपयापर्यंत पोचणार आहे. अशा परिस्थितीत गडहिंग्लज उपविभागातील शेतकऱ्यांना मात्र मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. 
 
गडहिंग्लज तालुक्‍याला लागून कर्नाटकातील चिक्कोडी तालुका आहे. प्रत्येक वर्षी तेथील चार ते पाच कारखाने या भागात ऊसतोडीसाठी येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील निर्णय होण्याअगोदरच तेथील कारखान्यांनी प्रति टनास ३००० रुपयांपर्यंत दर देण्याची तयारी दाखविली आहे. परंतु ऊसतोड बंद असल्याने शेतकऱ्यांना या कारखान्यांना ऊस पाठविणे अशक्‍य होते. आता तोड सुरू झाल्याने या कारखान्यांना ऊस पाठविणे शक्‍य होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com