नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित

टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित
टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित

नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक तालुक्यातील विहिरींतील पाणीपातळी खोल गेली आहे, तर अनेक जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करताना टँकरची संख्या पाच पटीने वाढण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने प्रशासनला पाणीपुरवठा करताना काटेकोरपणे नियोजन करावे लागत आहे. कोणत्याही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावयाचा असल्यास प्रथम त्यावर जीपीएस यंत्रणा असणे बंधनकारक आहे. ही यंत्रणा असल्याशिवाय टँकर मंजूर होत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.  सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एक हजार १० गावे, वाड्यांना २८२ टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत संपुष्टात येऊ लागल्याने टंचाईला तोंड देणाऱ्या गावांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात सध्या कार्यरत २८२ टँकरद्वारे दररोज ६५० फेऱ्या केल्या जात असल्याची कागदोपत्री नोंद करण्यात आली आहे, परंतु त्यानुसार पाणीपुरवठा होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे झालेल्या दुष्काळी स्थितीच्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. या गंभीर परिस्थितीत जीपीएस यंत्रणेबाबत अधिकारी अनभिज्ञ असल्याचे उघड झाले होते. जीपीएस यंत्रणेवर स्थानिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले होते. जिल्ह्यातील होणारा पाणीपुरवठा, टँकरच्या फेऱ्या आदींवर जीपीएस यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्याविषयी अनभिज्ञ असणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावल्यानंतर दुसऱ्या दिवशी समस्त यंत्रणा कामाला लागली आहे. यासंबंधीचे ‘यूजर नेम’ आणि ‘पासवर्ड’ मिळाल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील टँकरचे जीपीएस ‘ट्रॅकिंग’ सुरू केले. या माध्यमातून टँकरच्या फेऱ्या, पाणीपुरवठ्यातील्या त्रुटी आदी तत्सम बाबींची स्पष्टता होण्यास हातभार लागणार आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरवर मध्यवर्ती केंद्रातून नियंत्रण ठेवले जाते, परंतु स्थानिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नमूद केले होते. पाणीपुरवठा विभागाकडील टँकरवरील जीपीएस यंत्रणेसंबंधीचा ‘यूजर नेम’ आणि ‘पासवर्ड’ सर्व प्रांताधिकाऱ्यांना देण्याची सूचना करण्यात आली होती. टँकरवरील जीपीएस कार्यप्रणालीचे पासवर्ड हाती पडल्यानंतर सर्व तालुक्यांतील प्रांताधिकारी यांनी यानुसार कामकाज सुरू केले आहे. याद्वारे पाणीपुरवठ्यातील त्रुटी, फेऱ्यांची संख्या, स्थळ आदींबाबत आढावा घेतला जात आहे.  गैरप्रकारांना आळा बसणार जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या २८२ टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या टँकरमार्फत दररोज ६५० हून अधिक फेऱ्या केल्या जातात. या फेऱ्यांबाबत या कामकाजाचा आढावा घेता येणे शक्य झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत टँकरचालक नागरिकांना पाणीपुरवठा करण्याऐवजी कुठे विक्री करतात का? काही गैरप्रकार घडतो का? असा काही गैरप्रकार समोर आल्यास पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. णीपुरवठ्यातील त्रुटी, फेऱ्यांची संख्या, स्थळ आदींबाबत आढावा घेतला जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com