agriculture news in marathi,The hope of Kharip raised; Nashik taluka has 143% rain | Agrowon

खरिपाच्या आशा उंचावल्या; नाशिक तालुक्यात १४३ टक्के पाऊस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

नाशिक  : जिल्ह्यातील जवळपास निम्म्या तालुक्यांमध्ये पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे एक दिवसाच्या संततधारेमुळे ही सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरिपाच्या आशा उंचावल्या आहेत. नाशिक तालुक्यात सर्वाधिक १४३ टक्के पाऊस झाला असून, बागलाण तालुक्यात १४० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक  : जिल्ह्यातील जवळपास निम्म्या तालुक्यांमध्ये पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे एक दिवसाच्या संततधारेमुळे ही सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरिपाच्या आशा उंचावल्या आहेत. नाशिक तालुक्यात सर्वाधिक १४३ टक्के पाऊस झाला असून, बागलाण तालुक्यात १४० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

या महिन्यात जिल्ह्यात २३२४.५० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित आहे. सोमवारी (ता. २५) सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात १३८३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या दिवशी सायंकाळनंतर आणि मंगळवारी (ता. २६) दिवसभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात २१२७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच या एक-दोन दिवसांत ७४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जूनच्या सरासरीच्या ९१.५४ टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

चालू हंगामात १ ते २६ जूनदरम्यान आतापर्यंत १४१.८५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. माॅन्सूनमध्ये होणाऱ्या एकूण पावसाच्या तुलनेत हा पाऊस १४ टक्के आहे. नाशिकमध्ये १५ पैकी तीन तालुक्यांनी दोन दिवसांपूर्वीच जून महिन्याची सरासरी ओलांडली होती. मात्र, सोमवारच्या पावसानंतर अशी सरासरी ओलांडणाऱ्या तालुक्यांची संख्या सात झाली आहे. यामध्ये बागलाण, मालेगाव आणि येवलापाठोपाठ आता नाशिक, चांदवड, देवळा आणि सिन्नर या चार तालुक्यांची भर पडली आहे. या तालुक्यांमध्येही १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला.

तालुका   सरासरी पाऊस (मिमी)  झालेला पाऊस (मिमी) टक्केवारी
नाशिक   ९३.५०   १३३.८  १४३.१
मालेगाव १०२.३०  ११४.०  १११.४
चांदवड      ११५.७०    १४२.३    १२३
बागलाण  ९९.८०  १४०    १४०.३
देवळा ११५.४०  १२१.२    १०५
सिन्नर    ८९.३०    १०२.८   ११५.१
येवला  १२०.४०   १५६.६   १३०.१

 

 

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...