agriculture news in marathi,The six doors of the Hatanur Dam are opened | Agrowon

हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

जळगाव : मध्य प्रदेश व इतर भागांत पाऊस झाल्याने खानदेशची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या तापी नदीवरील हतनूर धरणाचे सहा दरवाजे रविवारी (ता. २४) मध्यरात्रीपासून पूर्णतः उघडे करण्यात आले आहेत.

जळगाव : मध्य प्रदेश व इतर भागांत पाऊस झाल्याने खानदेशची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या तापी नदीवरील हतनूर धरणाचे सहा दरवाजे रविवारी (ता. २४) मध्यरात्रीपासून पूर्णतः उघडे करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची स्थिती मात्र जेमतेम आहे. तर काही प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. हतनूर धरण भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्‍यांजवळ आहे. त्यात सोमवारी सहा टक्के जलसाठा होता. मध्य प्रदेशात या नदीचा उगम असून, नदीत पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे. मागील आठवड्याच्या सुरवातीलाही धरणाचे दोन दरवाजे उघडे होते. धरणातील प्रवाह वाढतच असल्याने सहा दरवाजे उघडण्याचा निर्णय संबंधित प्रशासनाने घेतला आहे. या धरणाच्या सांडव्यातून ३१३३ क्‍युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची पाणीपातळी २०८ मीटर एवढी आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा १५.३० द.ल.घ.मी. एवढा झाला आहे.

हतनूरच्या क्षेत्रात पाच मिलिमीटर पाऊस

हतनूर धरणाच्या क्षेत्रात रविवारी (ता.२४) पाच मिलिमीटर पाऊस झाला. हतनूर धरणात पाण्याचा प्रवाह आहे, परंतु जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची स्थिती मात्र बिकट आहे. गिरणा धरणात  टक्के, वाघूरमध्ये ३४.९६ टक्के जलसाठा आहे. तर अग्नावती, बहुळा, मन्याड, अंजनी या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. रावेर तालुक्‍यातील सुकी धरणातील साठा काहीसा वाढला असून, तो ३५ टक्के एवढा झाला आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...