agriculture news in marathi,thunderstorm in latur, usmanabad, maharashtra | Agrowon

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

पुणे  : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. २) रात्री उशिरा लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यांतील उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यांत वादळी पावसाने दणका दिला. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे ऊस, केळी बागांना फटका बसला असून, शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकासह इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. चांदवड (जि. नाशिक) तालुक्यात गारपिटीसह झालेल्या पावसाने द्राक्षे, टोमॅटो, फुलशेतीचे नुकसान झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज (ता.४) वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे  : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. २) रात्री उशिरा लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यांतील उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यांत वादळी पावसाने दणका दिला. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे ऊस, केळी बागांना फटका बसला असून, शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकासह इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. चांदवड (जि. नाशिक) तालुक्यात गारपिटीसह झालेल्या पावसाने द्राक्षे, टोमॅटो, फुलशेतीचे नुकसान झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज (ता.४) वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उस्मानाबादमधील उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला. पाडोळी येथे २४ तासांत ७२ मिलिमीटर पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे ढोकी (ता. उस्मानाबाद) येथे ऊसाचे पीक आडवे झाले. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे १३० मिलिमीटर, तुळजापूर ८५ पावसाची नोंद झाली. मंगरुळ (ता. तुळजापूर) परिसरात शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकाचे व केळीच्या बागांचेही नुकसान झाले. पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील देवरगाव परिसरात वादळी वारा आणि त्यानंतर अर्धा तास गारांचा पाऊस झाला. या पावसाने छाटणी झालेल्या द्राक्षबागांसह, टोमॅटो व फुलशेतीचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नाशिकसह मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली कोल्हापूरमध्ये पावसाने हजेरी लावली. कोकणातही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. वादळी पावसाने दणका दिला असताना राज्याच्या तापमानाही वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव, सोलापूर येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.

बुधवारी (ता. २) राज्याच्या विविध भागांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : मार्गताम्हाणे २०, कळकवणे ३०, दाभील २८, धामनंद ४२, फणसावणे ४२, मदुरा २७, वैभववाडी २५.   
मध्य महाराष्ट्र : उमराळे ११, घोटी २९, धारगाव २८, पेठ ३४, जोगमोडी १३, वडाळी १०, त्र्यंबकेश्‍वर १४, वेळुंजे १६, पारनेर १८, सुपा १६, कोळेगाव १६, खर्डा १०, शेंडी १०, कोतूळ ५०, माले १०, मुठे १६, बेल्हा १६, उपळाई १३, गौडगाव ३९, भेडसगाव २१, करकंब २२, पटवर्धन कुरोली ३२, इस्लामपूर १०, वेळापूर १२, अपशिंगे १०, केळघर १४, हेळवाक १५, तारळे २५, किन्हई २५, खटाव २०, महाबळेश्‍वर १२, तापोळा १४, लामज १८, मालगाव ४२, विटा ३७, कडेगाव १०, शिराेळ १७, जयसिंगपूर ११, नेसरी २०, गारगोटी १०, पिंपळगाव २३, कडेगाव १५, कराडवाडी १२, गवसे ३६, चंदगड १७, नारंगवाडी १३, कोवाड २७, हेरे ८५.
मराठवाडा : औसा ५५, लामजना ३२, मातोळा ४८, भादा २१०, किनी २०, निलंगा ५८, पानचिंचोली २१, नळेगाव ३६, उस्मानाबाद शहर ५१, बेंबळी ४१, पाडोळी ७२, कासेगाव ३३, ढोकी २५, तेर २३, तुळजापूर ८५, सालगारा १७, सावरगाव ३१, मंगरूळ १३०, लोहारा २०, माकणी २८, वाशी १५.

आकडेवारीतील घोळ कायम
औसा (जि. लातूर) तालुक्यातील भादा येथे बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अतिवृष्टी होत तब्बल २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. मात्र लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे भादा येथे ६८ मिलिमीटर पाऊस झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कृषी विभागाकडून मंडलनिहाय प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या पावसाच्या आकडेवारीतील घोळ अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.
 
राज्याच्या उत्तर भागातून माॅन्सून परतला
नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू असून, बुधवारी (ता.३) मॉन्सूनने राज्याच्या उत्तरेकडील काही भागांतून माघार घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रातील, नंदुरबार, धुळे, जळगाव, तर विदर्भातील गोंदियापर्यंतच्या भागांतून माॅन्सून परतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अरबी समुद्रामध्ये शुक्रवारपर्यंत (ता. ५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, तीव्रता वाढून त्याचे ‘चक्रीवादळात’ रूपांतर होण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...