agriculture news in Marathi,To open a fodder camp in Bulddana | Agrowon

बुलडाण्यात चारा छावणी उघडण्यास मुहूर्त मिळेना
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

बुलडाणाः जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत जनावरांचे अधिक हाल होत आहेत. प्रामुख्याने खामगाव, नांदुरा तालुक्यांतील जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्याची मागणी नागरिकांमधून सातत्याने केली जात होती. परंतु अद्यापही चारा छावणी सुरू करण्याच्या अनुषंगाने कुठलाही निर्णय प्रशासनाने दिलेला नाही. त्यामुळे मे महिना अंतिम टप्प्यात आलेला असताना चारा छावणीबाबत काहीही झालेले नाही. 

बुलडाणाः जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत जनावरांचे अधिक हाल होत आहेत. प्रामुख्याने खामगाव, नांदुरा तालुक्यांतील जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्याची मागणी नागरिकांमधून सातत्याने केली जात होती. परंतु अद्यापही चारा छावणी सुरू करण्याच्या अनुषंगाने कुठलाही निर्णय प्रशासनाने दिलेला नाही. त्यामुळे मे महिना अंतिम टप्प्यात आलेला असताना चारा छावणीबाबत काहीही झालेले नाही. 

बुलडाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्यावर्षी दुष्काळी परिस्थिती बनलेली आहे. या वर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. कुठल्याच प्रकल्पात पाणी पुरेशा प्रमाणात शिल्लक नाही. चाऱ्याचाही प्रश्न वाढलेला आहे. खामगाव तालुक्यातील वाकूड भागात चारा छावणी उघडावी यासाठी तेथील सरपंचासह नागरिकांनी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आठवडाभर आंदोलन केले.

तहसीलदाराच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन करण्यात आले. यानंतर प्रशासन जागेवरून हलले. चारा छावणीसाठी २० मेपर्यंत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर यंत्रणा पुन्हा निवडणुक मतमोजणीत अडकल्या होत्या. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या मागणीवर पडला. अद्याप चारा छावणी सुरु करण्याबाबत कुठलाही लेखी आदेश निघालेला नाही.

सध्या जनावरांची होरपळ सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणांकडून हा प्रश्न तितक्या गांभीर्याने हाताळला जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. मे महिना संपायला आला तरी छावणी सुरू झाली नाही. पाऊस या वर्षी लांबण्याची चिन्हे असल्याने चाराटंचाईचा प्रश्न आणखी दोन ते अडीच महिने भेडसावू शकतो, असे शेतकरी सांगतात. अशा स्थितीत जनावरांची सोय करण्यासाठी चारा छावणी तातडीने सुरू करण्याची मागणी सातत्याने केली आहे.

चारा छावणीचा निर्णय सोमवारी शक्य ः कैलास फाटे 
तालुक्यातील जनावरांची चारा व पाण्याची समस्या पाहता आम्ही सातत्याने चारा छावणीची मागणी लावून धरली. प्रशासनाने प्रस्ताव मागविले. पारखेड व वाकूड परिसरात चारा छावणी उघडली जाण्याची शक्यता आहे. याबाबत आपण स्वतः निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला असून त्यांनी लवकरच निर्णयाचे आश्वासन दिले. सोमवारी (ता. २७) याबाबत आदेश काढले जाण्याची शक्यता आहे. मुक्या जनावरांचा प्रश्न पाहता प्रशासनाने दिरंगाईचे धोरण सोडून द्यावे व छावणी उघडावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.
 

इतर बातम्या
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...