agriculture news in marathi,tur production decrease, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात तुरीचे उत्पादन घटले
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मला एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन आले. सूक्ष्मसिंचनाची व्यवस्था केली होती. पिकाची काळजी घेतली, परंतु पावसाचे पाणी हवे तसे नसल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम झाला.
- गजानन पाटील, तूर उत्पादक, केऱ्हाळे, जि. जळगाव.

जळगाव ः जिल्ह्यात कोरडवाहू तुरीचे कमाल दोन क्विंटल उत्पादन हाती येत आहे. बागायती किंवा सिंचन केलेल्या तुरीचे उत्पादन एकरी पाच क्विंटलपर्यंत आहे.यंदा बागायती तूर उत्पादकांना एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन कमी आल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्‍टरवर तुरीची लागवड झाली होती. कोरडवाहू तूर जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, जळगाव भागात अधिक होती. बागायती तुरीची लागवड रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगरमधील गावांमध्ये अधिक होती. तुरीची कापणी व मळणी अंतिम टप्प्यात आहे. अनेक शेतकऱ्यांनी उत्पादन घेत तिची विक्रीही बाजारात केली आहे. दर परवडणारे नाहीत. त्यातच आता उत्पादनही अपेक्षित प्रमाणात न आल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

रावेर, यावल भागात अनेक शेतकरी सूक्ष्मसिंचनावर तुरीची लागवड करतात. जूनमध्ये ही लागवड केली जाते. या भागातील शेतकरी एकरी नऊ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादनही अनेकदा घेतात. तुरीला कमी पाणी लागते, पण कोरडवाहू तुरीला पावसाच्या लहरीपणामुळे फटका बसला. ऑक्‍टोबरमध्ये पाऊस आला. पण त्या वेळी काळ्या कसदार जमिनीत पीक बरे असताना जादा पावसाची पिकाला बाधा झाली.

काळ्या कसदार जमिनीत मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. तूर लाल, पिवळी पडून वाळण्याचे प्रकार मर रोगामुळे झाले. यामुळे पिकात तूट आली. फूलगळही अधिकची झाली. परिणामी उत्पादन कमी आले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...