agriculture news in marathi,varna dam storage status, sangli, maharashtra | Agrowon

‘वारणा’त गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018
शिराळा, जि. सांगली ः शिराळा तालुक्‍यात उन्हाचा कडाका वाढला असून पाझर तलाव, विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. मात्र चांदोली येथील वारणा धरणात गतवर्षाच्या तुलनेत सव्वापाच टीएमसी जादा पाणीसाठा आहे. वारणा धरणात सध्या २३.६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
 
शिराळा, जि. सांगली ः शिराळा तालुक्‍यात उन्हाचा कडाका वाढला असून पाझर तलाव, विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. मात्र चांदोली येथील वारणा धरणात गतवर्षाच्या तुलनेत सव्वापाच टीएमसी जादा पाणीसाठा आहे. वारणा धरणात सध्या २३.६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
 
शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु, बदलत्या हवामानाचा फटका या तालुक्‍याला बसला आहे. येथे कोणत्यावेळी किती पाऊस पडेल हे सांगणे कठीण झाले आहे. मात्र येथील वारणा धरणामुळे या परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या धरणामुळे वारणा नदी बारमाही वाहू लागली आहे. वारणा कालव्यामुळे अनेक ठिकाणची माळरानावरील शेती बहरू लागली आहे. 
 
यावर्षी शिराळा तालुक्‍यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने धरणे, तलाव, विहिरींमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. परंतु, सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने पाझर तलाव व छोटी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे.
 
मोरणा धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शिराळा उत्तर भाग व मोरणाकाठच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी वाकुर्डे बुद्रुक योजना सुरू करून पाणी करमजाई तलावात सोडून ते पाणी मोरणा धरणात सोडण्यात आले आहे. वारणा काठच्या शेतीला पाणी देण्यासाठी व टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेसाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या धरणामुळे शिराळा आणि कऱ्हाड तालुक्‍यातील पिकांना जीवदान मिळत आहे. 

वारणा धरणाची एकूण क्षमता ३८ टीएमसी असून सध्या धरणात २३.६२ टीएमसी म्हणजेच ६८.६७ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी १८.३० टीएमसी म्हणजे ५३.२० टक्के तर २०१६मध्ये याच कालवधीत १६.७८ टीएमसी म्हणजे ४८.७० टक्के पाणीसाठा होता. आता या धरणातून मागणीनुसार पाणी सोडण्यात येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...