विदर्भातील कृषिपंपांना उच्चदाबाचा वीजपुरवठा मिळण्याची प्रक्रिया सुरू

विदर्भातील कृषिपंपांना उच्चदाबाचा वीजपुरवठा मिळण्याची प्रक्रिया सुरू
विदर्भातील कृषिपंपांना उच्चदाबाचा वीजपुरवठा मिळण्याची प्रक्रिया सुरू

अकोला : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना उच्चदाब क्षमतेची वीज जोडणी मिळणार असून,  यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील (एचव्हीडीएस) कामांची ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुमारे ८०४ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेद्वारे विदर्भातील तब्बल ५० हजार ३६५ कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीजजोडणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत यापुढे एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. यामुळे सतत विद्युतपुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची कायमची सुटका होईल. या योजनेसाठी लागणाऱ्या वितरण रोहित्रांच्या खरेदीची निविदा प्रक्रिया महावितरण मुख्यालयाने यापूर्वीच सुरू केली आहे.   

या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०१७ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीज जोडणी देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती. या अनुषंगाने राज्यस्तरावर सर्वेक्षण करण्यात येऊन याबाबतची योजना तयार करण्यात आली. यानुसार महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात ३१ मार्च २०१७ सोबतच, ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाऱ्या ग्राहकाला ‘एचव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे.

या ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे विजपुरवठ्यात सुधारणा करता येणे शक्य होणार आहे. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडळांनी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

जिल्हानिहाय कामांची निविदा - रुपये अकोला १३२ कोटी ४५ लाख, बुलडाणा १२७ कोटी १६ लाख, यवतमाळ १०७ कोटी ८७ लाख, वाशीम ९९ कोटी ५ लाख, अमरावती ८७ कोटी, नागपूर ५८ कोटी ७८ लाख, चंद्रपूर ५५ कोटी २२ लाख, भंडारा ४९ कोटी २२ लाख, वर्धा ३५ कोटी ७६ लाख, गोंदिया ३२ कोटी ५४ लाख, गडचिरोली १४ कोटी ७० लाख.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com