खडकवासला धरण साखळीतून पाण्याचा विसर्ग वाढला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पुणे शहराला पिण्यासाठी दौंड, इंदापूर आणि हवेली तालुक्यांना शेती आणि पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पानशेत, टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये शनिवारी (ता. ४) पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. दुपारीही पावसाचा जोर कायम असल्याने या दोन्ही धरणांमधून पाच हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून मुठा नदी पात्रात ८६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहेत.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जाेर आसेरला होता. अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे पाणलोटातील नद्या, नाले ओहळ वाहत असल्याने अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक हळूहळू सुरूच आहे. त्यामुळे या धरणांच्या सांडव्यातून तसेच कालव्यातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्गही सुरू होता. शनिवारी सकाळपासून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.

पानशेत धरणातून सकाळी २ हजार ५७४ क्युसेक तर टेमघरमधून ८०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. पाऊस वाढल्याने दोन्ही धरणांतून खडवासला प्रकल्पामध्ये साडे पाच हजार क्युसेक वेगाने पाणी जमा होत होते. त्यामुळे दुपारी चार वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ६०० क्युसेेक वेगाने नदीपात्रात, तर कालव्यातूनही १३५५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com