पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळ

पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळ
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळ

पुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पाणीटंचाईमुळे ऊस लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. पुणे विभागात ऊस लागवडीपासून सरासरीच्या तुलनेत जवळपास दोन लाख ५० हजार २४० हेक्टर क्षेत्र दूर राहिले आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखर कारखान्यांसमोर गळीत हंगामासाठी लागणाऱ्या उसाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. 

पुणे विभागात आडसाली, सुरू, पूर्वहंगामी, खोडवा उसाचे सरासरी चार लाख १३ हजार ५८० हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तीन लाखांहून अधिक हेक्टरवर ऊस लागवडी झाल्या होत्या. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, विभागात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पाणी टंचाईस सुरूवात झाली. येत्या काळात ती आणखी तीव्र होईल. सध्या पुणे विभागातील बहुतांशी गावे व वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये बारामती, दौड, पुरंदर, शिरूर, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर या सात तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

नगरमधील पारनेर, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, सोलापूरमधील मंगळवेढा, बार्शी, उत्तर सोलापूर, सांगोला या तालुक्यांसह उर्वरित तालुक्यातही पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे विहिरीतील पाणीपातळीतही चांगलीच घट झाली आहे. काही गावांत विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. त्याचबरोबर शेतीलाही पाणीटंचाईचा चांगलाच फटका बसू लागला आहे.

पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, बारामती, दौड, इंदापूर, शिरूर, नगरमधील नेवासा, राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, सोलापूरमधील करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, अक्कलकोट हे तालुके उसाचे आगार म्हणून ओळखले जातात. या तालुक्यात दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी उसाच्या लागवडी करून उत्पादन घेतात. काही शेतकरी खोडवा पिकांचेही उत्पादन घेतात. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात दरवर्षी चांगली वाढ होते. यंदा पावसाळ्यात कमी पावसाच्या आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसाच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे दोन लाख हेक्टरच्या पुढे उसाच्या लागवडी गेल्या नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून विभागातील काही भागांत ऊस लागवडी ठप्प आहेत. अनेक शेतकरी ऊस गाळप झाल्यानंतर खोडवा ठेवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे खोडवा पिकांचे २३ हजार २०० हेक्टरवर उसाचे क्षेत्र असल्याचे दिसून येते. अजून गळीत हंगाम सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com