agriculture news in marathi,water scaricity in satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

सातारा  ः जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर या पाच तालुक्‍यांतील १८ गावे ५८ वाड्यावस्त्यांवर १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात कमालीची उष्णता वाढली आहे. माण, खटाव, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर तालुक्‍यांतील गावांमध्ये पाणीटंचाई वाढू लागली आहे. यासाठी प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सातारा  ः जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर या पाच तालुक्‍यांतील १८ गावे ५८ वाड्यावस्त्यांवर १४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात कमालीची उष्णता वाढली आहे. माण, खटाव, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर तालुक्‍यांतील गावांमध्ये पाणीटंचाई वाढू लागली आहे. यासाठी प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

माण तालुक्‍याला टंचाईच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागत आहे. या तालुक्‍यात सर्वाधिक सहा टॅंकरद्वारे १० गावे आणि ४४ वाड्यावस्त्यांवरील ११ हजार ६१० लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. या तालुक्‍यात दिवसेंदिवस पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली असल्याने टॅंकरच्या संख्येत वाढ करावी लागत आहे.

खटाव तालुक्‍यातील पाच गावे व ११ वाड्यावस्त्यांवरील तीन हजार ९३८ लोकसंख्येस तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव, पाटण व महाबळेश्वर तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

यामध्ये कोरेगाव तालुक्‍यात एक गाव व एका वाडीवस्तीवरील १३२५ लोकसंख्येस एका टॅंकरद्वारे, पाटण तालुक्‍यातील दोन वाड्यावस्त्यावरील २४३ लोकसंख्येस दोन टॅंकरद्वारे व महाबळेश्वर तालुक्‍यातील दोन गावांतील १५५२ लोकसंख्येस एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

संरक्षित पाण्यासाठी नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाणीटंचाईचा फटका येथील जनावरांनाही बसू लागला आहे.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...