agriculture news in marathi,Water shortage down in Khandesh | Agrowon

खानदेशातील पाणीटंचाई गंभीर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

जळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत आहे. अगदी गिरणा व पांझरा नदीकाठच्या विहिरी, कूपनलिका आटत आहेत. केळी, पपई, कापसाच्या दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सातपुडा पर्वतालगतच्या गावांमध्येही टंचाई स्थिती चिंताजनक बनली आहे. शिवारात, गावात पाण्याचे संकट वाढत असल्याची स्थिती आहे. 

जळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत आहे. अगदी गिरणा व पांझरा नदीकाठच्या विहिरी, कूपनलिका आटत आहेत. केळी, पपई, कापसाच्या दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सातपुडा पर्वतालगतच्या गावांमध्येही टंचाई स्थिती चिंताजनक बनली आहे. शिवारात, गावात पाण्याचे संकट वाढत असल्याची स्थिती आहे. 

जळगावमधील रावेर हा मुबलक पाणी, केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे. परंतु, रावेरातील निरूळ व लगतच्या गावांमध्ये पाच दिवसाआड पिण्याचे पाणी येते. टॅंकर सुरू आहे. रोज २०० ते २५० लीटर पाणी एका कुटुंबाला या टॅंकरच्या माध्यमातून मिळते. यावलमधील न्हावी, हंबर्डी भागांतही टंचाई वाढत आहे. शिवारात केळीची शेती संकटात आहे. कूपनलिकांचे पाणी झपाट्याने आटू लागले आहे. 

चोपडा तालुक्‍यातही सातपुडालगतच्या खर्डी, लोणी, पंचक, धानोरा, अडावद, लासूर, चुंचाळे भागांतही जलसंकट आहे. भुईमुगाची शेती या भागात संकटात आहे. कांद्याची लागवड नगण्य आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, तऱ्हाडी, अर्थे, कुवे, निमझरी भागात पपईच्या बागा वेळेआधीच काढण्याची वेळ आली आहे. कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या तऱ्हाडीमध्ये लागवड १० टक्‍क्‍यांवर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातही सातपुडालगतच्या सुसरी, गोमाई नदीनजीकच्या गावांमध्ये पाण्याची समस्या वाढू शकते. शिवारात पाण्याची काटकसर करण्याची, केळी लागवड कमी करण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. 

पीक अर्ध्यावर सोडण्याची वेळ
खानदेशात जळगाव जिल्ह्यात सुमारे २८, धुळे, नंदुरबारात २५ टॅंकर सुरू आहेत. नंदुरबार तालुक्‍यात कोठली, पळाशी, धमडाई, पथराई, कोळदा, लहान शहादे, नाशिंदा, शिंदे, खोंडामळी, चौपाळे, रनाळे आदी ३५ गावांमध्ये टंचाई वाढली आहे. कोळदा येथे शिवारातून रोज पिण्याचे पाणी ग्रामस्थांना आणावे लागते. मिरचीची शेती अर्ध्यात सोडून देण्याची वेळ पळाशी, धमडाई, कोळदा भागांतील अनेक शेतकऱ्यांवर आली, असे सांगण्यात आले.

इतर बातम्या
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
हॉर्सशू खेकडे हे कोळ्यांच्या अत्यंत...घोड्याच्या पायासारख्या दिसणाऱ्या खेकड्यांना...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
पुणे-मुळशी बाजार समितीच्या विलीनीकरणास...पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचव्यांदा...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक...औरंगाबाद : ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...