टायर बंधाऱ्यात एक कोटी लिटर पाणीसाठा

पेठ येथे टायर बंधारा बांधल्याने सुमारे १ कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे. पुढील टप्प्यात याच ठिकाणी आणखी एक बंधारा बांधण्याचे नियोजन केले आहे. पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी नदीपात्राची खोली वाढविणार आहे. यामुळे अधिक पाणीसाठा होण्यास याची मदत होईल. - संपतराव पवार , सांगली.
पेठ येथील टायर बंधारा
पेठ येथील टायर बंधारा

सांगली  ः डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनात बांधलेला टायर बंधारा हा कमी खर्चात आणि टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून बांधण्यात आला आहे. हीच संकल्पना घेत संपतराव पवार आणि परिसरातील लोकांनी एकत्र येऊन पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीवर टायरचा बंधारा बांधला. या बंधाऱ्यात सुमारे १ कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे. यामुळे पेठ गावातील सुमारे १५ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

पेठ तालुक्‍यात टंचाईमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायम होता. हा बंधारा बांधण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पेठ गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. तिळगंगा नदी शिराळा तालुक्‍यात उगम पावते. १८ गावांना या नदीचा लाभ होतो.

या नदीच्या पाण्यावर सुमारे २० हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटणार आहे. हा बंधारा २४ मीटर लांब आणि दीड मीटर उंचीचा आहे. वाळवा तालुक्‍यात परतीच्या पावसाने हा बंधारा तुडूंब भरून वाहू लागला आहे. या कामासाठी डॉ. आमटे यांच्या महारोगी सेवा समितीने ४ लाख ४१ हजार रुपये दिले आहेत. गावातील लोकसहभागातून सुमारे १ लाख ३० हजार वगर्णी जमा केली आहे.

तिळगंगा नदीवर बांधलेल्या टायर बंधाऱ्यात १ कोटी पाण्याची साठवण झाली आहे. सध्याच्या पावसाने नदीकाठी असणाऱ्या विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामी पिके घेण्यास याचा उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांना वर्षभर पाणी पुरावे यासाठी पाणी साठवण क्षमता वाढविण्याकरिता खोदाई केली जाणार आहे. यासाठी महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांची श्रमदानाकरिता मदत घेण्यात येणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com