agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे  ः गेल्या आठवड्यापासून वाढलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणातील बहुतांशी भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील भारणे येथे ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. २३) आणि उद्या (ता. २४) पावसाची बहुतांशी भागात उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

पुणे  ः गेल्या आठवड्यापासून वाढलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणातील बहुतांशी भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील भारणे येथे ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. २३) आणि उद्या (ता. २४) पावसाची बहुतांशी भागात उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत आहे. सौराष्ट्र व परिसर समुद्रसपाटीपासून ५.८ आणि ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती छत्तीसगडचा उत्तर भागात कमी दाबाचा असलेला पट्टा ओढून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पट्टा मध्य प्रदेशाच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात उद्या (ता. २५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे रविवारपासून पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर सावरडे येथे ८८, शिरगाव ८५, कोडगाव ८३, देवरूख ६८, शिरशी ६५, तुलसानी ६३ मिलिमीटर पाऊस पडला. तर उर्वरित भागातही हलक्या सरी बरसल्या. तसेच ताम्हिणी, कोयना, शिरगाव, लोणावळा, वळवण, भिवपुरी, दावडी, डुंगरवाडी, अंबोणे, खोपोली, वाणगाव, ठाकूरवाडी या घाटमाथ्यांवरही पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील करंजफेन येथे ७८ मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली. आंबा येथे ७६, भोळावडे ६८, इगतपुरी ६२, शिवणे ५५, लोमआवळा ५२, निगुडघर, राधानगरी ५१ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मराठवाड्यातही पावसाचा जोर ओसरला असला तरी, अनेक भागांत ढगाळ हवामान होते. जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर औरंगाबाद जिल्ह्यांतील एखाददोन ठिकाणी हलक्या सरी पडल्या. विदर्भातील झरी, दैठणा, टेंभुर्णी, जेवती, जिमगट्टा या ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या.

गुरुवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत कृषी विभाग)
कोकण विभाग ः ठाणे ४२, नेरळ ६८.६, कडाव ४०, कळंब ६६, कशेले ४१, वौशी ४८, माणगाव ४२, गोरेगाव ४८, लोनेरे ५३, निजामपूर ५२, कोलाड ५०, पोलादपूर ४९, कोंडवी ४५, वाकण ५३, तला ४४, मेंढा ८०, चिपळूण ३८, खेरडी ५३, मरगतम्हाणे ५०, रामपूर ४५, वाहल ४०, सावरडे ८८, असुरडे ६०, शिरगाव ८५, दापोली ४०, बुरवंडी ४४, दाभोल ४९, अंजरला ४१, वाकवली ४५, पालगड ४५, खेड ४९, शिरशी ६५, अंबवली ६२, कुलवंडी ४७, भारने ९२, धामनंद ४२, मंडणगड ५६, म्हाप्रल ५०, देव्हरे ६१, टरवल ५२, कडवी ४२, अंगवली ५०, कोडगाव ८३, देवली ४२, देवरूख ६८, तुलसानी ६३, राजापूर ६०, भांबेड ५५, विलवडे ६०, बांडा ४८.

मध्य महाराष्ट्र ः बाऱ्हे ३३,५, मानखेड ३२.७, सुरगाणा ४२, इगतपुरी ६२, घोटी ४०, ताकेत ३१, धारगाव ३१, त्रिंबकेश्‍वर ३०, दाब ३९, माले ४१, मुठे ५१, भोलावडे ६८, आंबवडे ३२, निगुडघर ५१, काले ४०, खडकाळा ३२, लोणावळा ५२, शिवणे ५५, वेल्हा ४७, पाणशेत ४३, विंझर ३१, राजूर ४३, वाडा ४३, कुडे ३०, शिरसी २८, करंजफेन ७८, मलकापूर ३८, आंबा ७६, राधानगरी ५१, कडेगाव ३०, गवसे ३१.

मराठवाडा ः शेवळी १७, वाडीगोद्री १२, उस्मानाबाद शहर १२, बेंबळी १६, कासेगाव ११, भूम १७, वालवड १०, लोहारा १३, बारूळ ११.

विदर्भ ः झरी १२, दैठणा १५, टेंभुर्णी ११, जेवती १०.४, जिमलगट्टा १४.६.

इतर अॅग्रो विशेष
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...