agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon

राज्यात पावसाला पोषक हवामान तयार
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे   : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असून, आज (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्रात, तर उद्या (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्रसह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे   : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असून, आज (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्रात, तर उद्या (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्रसह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर आसेरला असून, अनेक भागांत पावसाची उघडीप आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. २५) दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यात बहुतांशी भागात ढगाळ हवामान होते. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामानसह पावसाने हजेरी लावली, तर उर्वरित भागात मुख्यत: कोरडे हवामान होते.

पश्‍चिम बंगाल अाणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर ओडिशा किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता रविवारी (ता. २६) वाढणार अाहे. तर माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत सक्रिय आहे. या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे ओडिशा, झारखंड, छत्तीसगडमध्ये जाेरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये पाऊस वाढणार असून, महाराष्ट्रातही सोमवारपर्यंत (ता. २७) अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.      

शनिवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - कृषी विभाग) : कोकण : कसू ३०, महाड ३४, तुडली ३१, पोलादपूर ४२, चिपळूण ३०, कळकवणे ४०, शिरगांव ४७, दाभोळ ३१, वाकवली ३२, पालगड ३९, वेळवी ३०, भरणे ४८.
मध्य महाराष्ट्र : वेळुंजे २६, शेंडी ३४, बामणोली २४, महाबळेश्‍वर ४२, तापेळा ३८, लामज ४७, करंजफेन २३, आंबा ५१, साळवण २३.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...