agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे  मॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. आज  (ता. २७) कोकण, मध्य   महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत (ता.२९) पाऊस पडण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे  मॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. आज  (ता. २७) कोकण, मध्य   महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत (ता.२९) पाऊस पडण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बंगालच्या उपसागरात पश्‍चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत हवेचे कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, आज (ता. २७) त्याची तीव्रता वाढणार आहे. या कमी दाब क्षेत्रामुळे माॅन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळणार असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीसह अंतर्गत भागात बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उद्यापासून (ता. २८) मराठवाडा आणि विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला होता. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपात पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारनंतर पूर्व विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले होते. तर मध्य महाराष्ट्र, कोकणात दिवसभर ऊन - पावसाचा खेळ सुरू होता.

रविवारी (ता.२६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : मुरबाड ३७, न्याहडी ३१, खारबाव ३४, गोरेगाव ३५, कर्जत ४६, नेरळ ४६, कडाव ४३, कळंब ४६, कशेले ४८, वौशी ३६, खोपोली ३५, आटोने ४१, जांभूळपाडा ३२, पेण ३०, कसू ४०, कामरली ३३, महाड ४४, करंजवाडी ३२, खारवली ३४, तुडली ३६, माणगाव ५२, लोणेरे ३१, निझामपूर ३०, पोलादपूर ३३, कोंडवी ३७, वाकण ४६, मुरूड ३०, मार्गताम्हाणे ४६, रामपूर ४०, कळकवणे ३२, शिरगांव ८२, खेड ३२, शिर्शी ४२, भरणे ३६, दाभील ४०, तरवल ३९, लांजा ३१, विलवडे ३३, सांगवे ३२, जव्हार ३०, मोखडा ३६.
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३८, धारगाव ३७, शेंडी ६३, पौड ४१, घोटावडे ४४, माले ५६, मुठे ७४, पिरंगूट ३९, निगुडघर ५५, खडकाळा ५१, लोणावळा ७१, शिवणे ३५, वेल्हा ३१, पानशेत ३५, राजूर ३२, बामणोली ४३, केळघर ४४, हेळवाक ५५, महाबळेश्‍वर ६०, तापोळा ६३, लामज ७८, आंबा ५२, राधानगरी ३०. मराठवाडा : शेलगाव १९, झरी १२, इतकूर १३.
विदर्भ : बोराखेडी १२, किन्हीराजा १५, मुंगळा १५, शेलू बाजार १२, धानोरा २०, गिरोली १०, धारणी २२, धुळघाट १८, सावळीखेडा १५, चिखलदरा १२, सेमडोह १६, रिसेगाव १५, दिग्रस १०, सावळी १२, घोटी १२, पारवा १६, सडक अर्जुनी १४, पिसेवढथा १९.

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...