agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon

राज्यात अाज सर्वदूर पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे  : कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.२८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे  : कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.२८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उडीशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी (ता.२७) ठळक झाले होते. तर, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून, उत्तर अंदमान समुद्रापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण भारतात वाऱ्यांचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र स.िक्रय असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज राज्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. तर, उद्यापासून (ता. २९) कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ११५, साताऱ्यातील हेळवाक येथे १०३, महाबळेश्‍वर येथे १०७, लामज येथे ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाने आेढ दिलेल्या मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.  

सोमवारी(ता.२७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) : कोकण : महाड ४६, करंजवडी ४२, नाटे ४१, खारवली ४०, गोरेगाव ४०, रोहा ४८, कोलाड ४३, पोलादपूर ४९, कोंडवी ४७, तला ५२, मेंढा ६०, मार्गताम्हाणे ५५, वाहल ४५, सावर्डे ४६, असुर्डे ४७, कळकवणे ६०, शिरगाव ७४, दापोली ४२, खेड ५३, शिरशी ४८, कुलवंडी ६१, भरणे ४१, दाभील ४२, अबलोली ४०, तरवल ४२, कडवी ४६, मुरडव ४७, फणसावणे ४४, देवळे ४३, देवरुख ४०, पाटगाव ४०, बांदा ४४, अंबोली ११५, फोंडा ५०, कडवल ४०, भेडशी ५३.

मध्य महाराष्ट्र : धारगाव ६०, शेंडी ३०, माले ३३, मुठे ७४, पिरंगुट ३६, भोलावडे ३४, नसरापूर ३२, निगुडघर ४७, काले ६०, वेल्हा ४९, पानशेत ४४, विंझर ३१, आपटाळे ४०, बामणोली ३५, केळघर ३५, हेळवाक १०३, महाबळेश्‍वर १०७, तापोळा ९८, लामज ११७, कोतोली ३४, आंबा ४१, राधानगरी ३९, साळवण ३४, गवसे ४२, चंदगड ३८.

मराठवाडा : अंबाजोगाई ३०, विडा ३८, मातोळा ३२, अहमदपूर ३९, किनगाव ३४, वाढवणा ३१, देवार्जन ३९, नळेगाव ३५, शेलगाव ३४, जळकोट ४०, डाळिंब ३१, नांदेड ग्रामीण ३२, लिंबगाव ४३, तरोडा ३६, मुखेड ४०, चांडोळा ३०, कंधार ३८, बारुळ ३०, माळाकोळी ३३, हदगाव ३८, तामसा ३६, चुडवा ३४, हयातनगर ३८.

विदर्भ : बोरी ३०, विरळी ३९, लाखांदूर ४३, सालकेसा ३२, केशोरी ३४, ब्रह्मपुरी ३९, कुरखेडा ४७, पुराडा ४०, काढोली ६८, अारमोरी ३४, देऊळगाव ३८, पिसेवढथा ३६, वैरागड ३४, कोरची ३४, बेडगाव ३०, कोटगुळ ३५, देसाईगंज ६०, शंकरपूर ८०.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...