agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

पुणे  : पावसाने दडी मारल्यानंतर उन्हाचा वाढलेला चटका पुढील काही दिवस कायम राहणार अाहे. राज्यात रविवारपर्यंत (ता. १६) मुख्यत: पावसाची उघडीप राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी मोठ्या खंडानंतर पावसाची हजेरी लावल्याने वातावरणात काहीसा गारवा आला होता.

पुणे  : पावसाने दडी मारल्यानंतर उन्हाचा वाढलेला चटका पुढील काही दिवस कायम राहणार अाहे. राज्यात रविवारपर्यंत (ता. १६) मुख्यत: पावसाची उघडीप राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी मोठ्या खंडानंतर पावसाची हजेरी लावल्याने वातावरणात काहीसा गारवा आला होता.

मंदावलेले मॉन्सूनचे प्रवाह आणि उत्तरेकडे गेलेला माॅन्सूनचा आस यामुळे गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. तर पूर्व भारतासह ईशान्य भारतातील राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी आंध्र प्रदेश, तेलंगणासह मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाने हजेरी लावली. उर्वरीत राज्यात तापमानात वाढ होऊन जवळपास सर्वच ठिकाणी पारा ३१ अंशांच्या पुढे गेला आहे. जळगाव, नगर, सोलापूर, परभरणी, अकाेला, नागपूर, वर्धा येथे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. वाढत्या उन्हाबरोबरच उकाड्यातही वाढ झाली असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे.

बुधवार (ता.१२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.२, नगर ३३.०, जळगाव ३३.४, कोल्हापूर ३१.३, महाबळेश्‍वर २२.१, मालेगाव ३२.८, नाशिक २९.३, सांगली ३२.८, सातारा ३१.५, सोलापूर ३४.९, मुंबई ३२.०, अलिबाग ३०.५, रत्नागिरी ३०.५, डहाणू ३१.५, आैरंगाबाद ३२.६, परभणी ३३.४, नांदेड ३१.०, अकोला ३३.६, अमरावती ३२.२, बुलडाणा २९.०, चंद्रपूर ३५.०, गोंदिया ३२.२, नागपूर ३३.७, वर्धा ३४.०, यवतमाळ ३२.०.

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...