agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon

कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या व्याप्तीचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात उद्यापासून (शुक्रवारी, ता. २१) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला अाहे.

पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात उद्यापासून (शुक्रवारी, ता. २१) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला अाहे.

बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यांत पाऊस पडला, तर सकाळपासून असलेल्या उकाड्यानंतर दुपारी राज्यात ढग गोळा होऊन पुणे, परभणी, अकोला जिल्ह्यांत पावसाला सुरवात झाली होती. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, आज (ता.२०) त्याचे कमी तीव्रतेचे वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर होण्याची शक्यता आहे.

ही तीव्र प्रणाली शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणम अाणि पुरीच्या परिसरावर जमिनीवर येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगत ताशी ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रासह ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, झारखंड, पश्‍चिम बंगाल या राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बुधवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्राेत - कृषी विभाग) : कोकण : न्याहडी ६३, उरण ३३, कापरोली ४०, जसइ ४२.
मध्य महाराष्ट्र : कळवण २०, नाशिक ५३, शिंदे ३७, मडसांगवी २०, मखमलाबाद २५,  धारगाव २५, ओझर ४२, नांदूर २३, त्र्यंबकेश्‍वर ३०, प्रतापपूर २९, पारनेर ३८, श्रीगोंदा २८, कोळेगाव ३६, जामखेड ३४, अकोले ५३, समशेरपूर ३७, बेल्हा २९, घोडेगाव २०, मंचर २२, तळेगाव ढमढेरे २७, बारामती २४, पणदरे ७९, वडगाव ५५, लोणी २७, मोरगाव २९, उंडवडी २५, अंथुर्णी ४०, सणसर ३७, दौंड २०, जेजुरी ३३, सुर्डी २१, नातेपुते २२, वडूथ २६, राजाळे २८. मराठवाडा : टाकळसिंग ३१, बेंबळी २५, कंधार २७, शेवडी २५.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...