agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon

राज्यात उन्हाचा चटका कायम
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

पुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांपुढे गेला असून जळगाव, मालेगाव, सोलापूर, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, यवतमाळ येथे उन्हाचा चटका अधिक आहे. शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारपर्यंत (ता. १७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांपुढे गेला असून जळगाव, मालेगाव, सोलापूर, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, यवतमाळ येथे उन्हाचा चटका अधिक आहे. शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारपर्यंत (ता. १७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान २८ ते ३८ अंशांच्या आसपास आहे. कोकणात ३२ ते ३४, मराठवाड्यात ३४ ते ३६ आणि विदर्भात ३२ ते ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या वर असून, विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. परभणी येथे राज्यातील नीचांकी १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.

बंगालच्या उपसागरामधील वादळ निवळले असून, शनिवारी सकाळी पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाब क्षेत्र सक्रिय होते. त्यामुळे अोडीशा, पश्‍चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांमध्ये ढगांची दाटी झाली असून, या भागात पाऊस पडत आहे. तर अरबी समुद्रातील ‘लुबन’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. आज (ता. १४) दुपारपर्यंत हे वादळ रियान (येमेन) आणि अल-घैदाह (आेमान) जवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी (ता. १३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.१, जळगाव ३८.०, कोल्हापूर ३३.८, महाबळेश्वर २७.८, मालेगाव ३६.०, नाशिक ३४.१, सातारा ३२.८, सोलापूर ३६.६, सांताक्रूझ ३४.७, अलिबाग ३२.७, रत्नागिरी ३३.५, डहाणू ३४.१, आैरंगाबाद ३५.०, परभणी ३५.५, नांदेड ३६.०, उस्मानाबाद ३४.३, अकोला ३६.८, अमरावती ३६.०, बुलडाणा ३४.०, ब्रह्मपुरी ३४.०, चंद्रपूर ३४.२, गोंदिया ३२.०, नागपूर ३३.५, वर्धा ३५.०, यवतमाळ ३६.०.

दक्षिण भारतात माॅन्सूनचे अस्तित्व
महाराष्ट्रासह बहुतांशी देशांतून परतीची वाटचाल अवघ्या आठ दिवसांत पूर्ण करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) अद्यापही देशाचा निरोप घेतलेला नाही. महाराष्ट्रातून गेल्या आठवड्यात शनिवारी (ता. ६) परतल्यानंतर लुबन आणि तितली चक्रीवादळांच्या निर्मितीमुळे मॉन्सूनची वाटचाल मंदावली आहे. दक्षिण भारतातील राज्यामध्ये मॉन्सूनचे अस्तित्व असून, मच्छलीपट्टणम, कर्नुल, गदग, वेंगुर्लापर्यंतची मॉन्सूनची परतीची सीमा शनिवारी (ता. १३) कायम असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...