agriculture news in marathi,weather prediction, pune, maharashtra | Agrowon

दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम आहे. रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईत सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कर्नाटक आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे पावसाला पोषक हवामान होत असल्याने दक्षिण कोकणात बुधवारपासून (ता. १७) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम आहे. रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईत सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कर्नाटक आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे पावसाला पोषक हवामान होत असल्याने दक्षिण कोकणात बुधवारपासून (ता. १७) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे असल्याने दुपारी उन्हाच्या झळा लागत आहेत. उकाड्यातही वाढ झाली आहे. दुपारनंतर काही भागात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. मुंबईसह कोकणातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात घट होऊ लागली असून, पारा सरासरीच्या खाली उतरला आहे. नाशिक येथे राज्यातील नीचांकी १६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणामध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर आहे.

बंगालच्या उपसागरामधील वादळ निवळले आहे. अरबी समुद्रातील ‘लुबन’ चक्रीवादळ रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अल-घैदाहच्या (आेमान) दक्षिण भागात किनाऱ्याला धडकले. जमिनीवर येताच या वादळाची तीव्रता कमी होऊ लागली असून, आज त्याचे कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये समुद्र सपाटीपासून १.५ ते ४.५ किलोमीटर उंचीवर, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आणि तामिळनाडूमध्ये ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असल्याने दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये बुधवारपासून हलक्या पावसाची शक्यता आहे. 

रविवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.९, जळगाव ३६.०, कोल्हापूर ३३.७, महाबळेश्वर २७.७, मालेगाव ३५.२, नाशिक ३३.८, सांगली ३४.४, सातारा ३२.७, सोलापूर ३६.१, सांताक्रुझ ३७.०, अलिबाग ३५.२, रत्नागिरी ३४.५, डहाणू ३६.५, आैरंगाबाद ३४.२, परभणी ३६.१, नांदेड ३६.०, अकोला ३५.६, अमरावती ३६.२, बुलडाणा ३१.०, ब्रह्मपुरी ३४.०, चंद्रपूर ३४.०, गोंदिया ३२.४, नागपूर ३४.०, वर्धा ३४.७, यवतमाळ ३५.५.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...