agriculture news in marathi,weekly commodity rates in market committee kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरात कांदा १००० ते ४२०० रुपये क्विंटल
राजकुमार चौगुले
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात कांद्याच्या आवकेत मागील सप्ताहाच्या तुलनेत अडीच हजार क्विंटलने वाढ झाली. कांद्यास १००० ते ४२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गेल्या सप्ताहात कांद्याची एकूण आवक १४ हजार ७८३ क्विंटल होती. या सप्ताहात १७,२६७ क्विंटल झाली.
 
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात कांद्याच्या आवकेत मागील सप्ताहाच्या तुलनेत अडीच हजार क्विंटलने वाढ झाली. कांद्यास १००० ते ४२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गेल्या सप्ताहात कांद्याची एकूण आवक १४ हजार ७८३ क्विंटल होती. या सप्ताहात १७,२६७ क्विंटल झाली.
 
बटाट्याच्या आवकेतही २८०० क्विंटलने वाढ झाली. बटाट्यास सरासरी ७१५ रुपये क्विंटल असा दर मिळाला. गेल्या सप्ताहातील बटाट्याचा सरासरी दर ७८० रुपये इतका होता. लसणाच्या आवकेतही गेल्या सप्ताहाच्या तुलनेत एक हजार क्विंटलने वाढ झाली. लसणास सरासरी ३००० रुपये क्विंटल दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 
 
भाजीपाल्यामध्ये वांगी, ओला वाटाण्याचे दर या सप्ताहातही तेजीत होते. वांग्याची दररोज एक हजार करंड्या आवक झाली. वांग्यास १४० ते ३७० रुपये प्रतिदहाकिलो असा दर होता. परतीच्या पावसामुळे बहुतांशी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली होती. यामध्ये वांग्याचे दरही लक्षणीय वाढले होते. हे दर अद्यापही बाजार समितीत कायम आहेत. सध्या ढगाळ हवामानामुळे वांग्याचे व्यवस्थापन करणे अशक्‍य होत आहे. यामुळे वांग्याची आवक अनियमित आहे. परिणामी वाढलेले दर कायम असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
 
बाजार समितीत टोमॅटोची दररोज दोन हजार कॅरेट आवक झाली. टोमॅटोस १०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत भेंडीच्या आवकेत सुधारणा झाली होती. भेंडीची दररोज तीनशे ते चारशे करंड्या आवक झाली. भेंडीस १०० ते ४५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला.
 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दररोज पंचवीस ते तीस हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...