agriculture news in marathi,weekly commodity rates in market committee kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरात गवार ३०० ते ५६० रुपये दहा किलो
राजकुमार चौगुले
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : येथील बाजार समितीत गतसप्ताहात गवारीचे दर तेजीत राहिले. गवारीची दररोज ६० ते ७० पोती आवक झाली. गवारीस ३०० ते ५६० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. हिरव्या (ओली) मिरचीची दररोज ५०० ते ६०० पोती आवक झाली. मिरचीला २१५ ते ४२० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत ढोबळी मिरचीची दररोज ६०० ते ७०० पोती आवक झाली. ढोबळी मिरचीस १०० ते २३० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. भेंडीची ४०० ते ५०० करंड्या आवक झालीे. भेंडीस १०० ते ३०० रुपये प्रति दहाकिलो असा दर मिळाला.

कोल्हापूर : येथील बाजार समितीत गतसप्ताहात गवारीचे दर तेजीत राहिले. गवारीची दररोज ६० ते ७० पोती आवक झाली. गवारीस ३०० ते ५६० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. हिरव्या (ओली) मिरचीची दररोज ५०० ते ६०० पोती आवक झाली. मिरचीला २१५ ते ४२० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत ढोबळी मिरचीची दररोज ६०० ते ७०० पोती आवक झाली. ढोबळी मिरचीस १०० ते २३० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. भेंडीची ४०० ते ५०० करंड्या आवक झालीे. भेंडीस १०० ते ३०० रुपये प्रति दहाकिलो असा दर मिळाला.

वरण्याची ७० ते ८० पोती आवक झाली. वरण्यास २०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. काकडीची पाचशे करंड्या आवक झाली. काकडीस १०० ते ३२० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. आल्याची ७०० ते ८०० पोती आवक झाली. आल्यास १५० ते ३५० रुपये प्रति दहाकिलो असा दर होता.

कोथिंबिरीची चौदा ते पंधरा हजार पेंढ्या इतकी आवक होती. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ५०० रुपये दर होता. कांदापातीची चार हजार पेंढ्या आवक होती. कांदापातीस शेकडा १०० ते ४०० रुपये दर मिळाला. मका कणसाच्या आवकेत घट झाली होती. मका कणसाचे शंभर ते दोनशे नग इतकीच किरकोळ आवक राहिली. मका कणसास शेकडा ३०० ते ५०० रुपये दर होता.

या सप्ताहात फळांच्या आवकेत वाढ दिसून आली. द्राक्षाची दररोज चारशे ते पाचशे बॉक्‍स आवक होती. द्राक्षास २० ते ३५ रुपये किलो दर होता. चिकूची पाचशे ते सातशे पोती आवक झाली. चिकूस शेकडा ५० ते ७०० रुपये दर होता.

पेरुची पन्नास ते साठ डाग आवक झाली. पेरूस प्रतिडाग ४०० ते ८०० रुपये दर मिळाला. कलिंगडाची दीड ते दोन हजार डझन आवक होती. कलिंगडास डझनास ५० ते १५०० रुपये दर होता. कैरीच्या आवकेसही सुरवात झाली आहे. कैरीस ६० ते १२० रुपये प्रति दहाकिलो दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...