नागपूरमध्ये हरभरा सरासरी ५६४० रुपये क्विंटल

हरभरा दर
हरभरा दर
नागपूर ः कळमना बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून येणाऱ्या हरभरा दरात चढउतार होत असल्याचे चित्र आहे. महिन्याच्या सुरवातीला हरभऱ्याचे दर ४८०० ते ५६८२ रुपये क्‍विंटल होते. मध्यंतरी हरभरा ६२९६ रुपये क्विंटलवर पोचला होता. त्यानंतर आता सरासरी ५६४० रुपये क्‍विंटलवर हरभऱ्याचे दर स्थिरावले आहे.
बाजारात हरभऱ्याची आवक सातत्याने होत आहे. बाजारात तेजीचा अंदाज लावत शेतकऱ्यांनी हरभरा साठवणूक केला होता. त्यामुळे बाजारात सरासरी ३०० ते ४५० क्‍विंटल अशी हरभऱ्याची आवक आहे. सध्या हरभऱ्याला ५००० ते ६००० रुपये क्‍विंटल असे दर आहेत. रबी हंगामातील हरभऱ्याची आवक होईस्तोवर हरभरा आवकेत चढ उतार होत राहतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केली.
बाजार समितीत सध्या तुरीचे दर ४००० रुपये क्‍विंटल आहे. मुगाच्या दरात बुधवारी (ता. २०) अचानक तेजी दिसून आली. मुगाचे सरासरी दर ४००० रुपये क्‍विंटल असताना बुधवारी मात्र ५५०० रुपये क्‍विंटलवर हे दर पोचले. त्या दिवशी केवळ ९ क्‍विंटल मुगाची आवक झाली. उडीदाचे दर ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटल आहे. उडीदाची आवक १३ ते १५  क्‍विंटलदरम्यान होत आहे. सोयाबीनची आवक सरासरी ५०० क्‍विंटल असून, कमाल २९५० रुपये क्‍विंटल असा दर सोयाबीनला मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com