नागपुरात सोयाबीन २८०० रुपये क्विंटल

सोयाबीन
सोयाबीन
नागपूर ः येथील कळमना बाजारात हंगामातील सोयाबीनची आवक वाढली असून, त्यासोबतच दरातही किरकोळ तेजी असल्याचे चित्र आहे. सोमवारी (ता.२०) सोयाबीन गत आठवड्यातील २६०० रुपये प्रतिक्‍विंटल दरावरून २८०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. सोयाबीन दरात अशाच प्रकारच्या किरकोळ तेजीचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. 
 
आठवड्यात सोयाबीनची ३५ हजार क्‍विंटलच्या आसपास आवक नोंदविण्यात आली. सोयाबीनचे दर १३ नोव्हेंबरला २३०० ते २६४० रुपये क्‍विंटल होते. १६ नोव्हेंबर रोजी आवक ६ हजार क्‍विंटलवर पोचली, तर दरही २७०० रुपये क्विंटल होते. २० नोव्हेंबरला सोयाबीनची आवक साडेतीन हजार क्‍विंटल, तर दर २४०० ते २८११ रुपये क्विंटलवर पोचले.
 
बाजारात भुईमूग शेंगांची आवक दररोज सरासरी ८० ते १०० क्‍विंटल होत आहे. भुईमूग शेंगाचे दर ३००० ते ३५०० रुपये क्विंटल असे गेल्या आठवड्यापासून स्थिर आहेत.
 
फळगळ आणि इतर अनेक कारणांमुळे संत्र्याची उत्पादकता घटली आहे. त्याचा परिणाम दरावरदेखील होत असून दरातील तेजीचा अनुभव शेतकरी घेत आहेत. सोमवारी २६०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलने संत्र्याचे व्यवहार झाले. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना हा दर मिळाला. यापुढील काळात संत्राचे दर आणखी वधारतील, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com