agriculture news in marathi,weekly commodity rates in market committee nashik, maharashtra | Agrowon

नाशिकला टोमॅटोच्या दरातील तेजी कायम
ज्ञानेश उगले
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017
नाशिक : जिल्ह्यात टोमॅटो हंगामाने वेग घेतला असून, गत सप्ताहातही टोमॅटोच्या दरातील तेजी कायम असल्याचे चित्र दिसून आले.
 
जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, लासलगाव या बाजार समित्यांसह गिरणारे, वणी, पिंपळनारे या शिवार सौद्यातील बाजारातही टोमॅटोची आवक झाली. या वेळी टोमॅटोच्या प्रति२० किलोच्या क्रेटला ४०० ते ७०० रुपये, तर सरासरी ६०० रुपये दर मिळाले. मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या दरातील तेजी टिकून आहे.
 
नाशिक : जिल्ह्यात टोमॅटो हंगामाने वेग घेतला असून, गत सप्ताहातही टोमॅटोच्या दरातील तेजी कायम असल्याचे चित्र दिसून आले.
 
जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, लासलगाव या बाजार समित्यांसह गिरणारे, वणी, पिंपळनारे या शिवार सौद्यातील बाजारातही टोमॅटोची आवक झाली. या वेळी टोमॅटोच्या प्रति२० किलोच्या क्रेटला ४०० ते ७०० रुपये, तर सरासरी ६०० रुपये दर मिळाले. मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या दरातील तेजी टिकून आहे.
 
नाशिक जिल्ह्यातून उत्तर भारतासह बांगलादेश, श्रीलंका, दुबई या देशांत टोमॅटोची निर्यात होते. यंदा मागणीच्या तुलनेत आवकेत ६० टक्‍क्‍यांची घट असल्याने टोमॅटोला मागणी कायम असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. नाशिक भागातील टोमॅटो पिकाला मागील महिन्यात जोरदार पावसाने झोडपले. या स्थितीत उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे.
 
गिरणारे बाजारात दररोज सरासरी ५० हजार क्रेटची आवक होत असताना टोमॅटोला प्रति२० किलोच्या क्रेटला ४०० ते ७०० असा दर मिळतो आहे. बाजाराची स्थिती येत्या सप्ताहातही कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. येत्या काळात आवक वाढण्याची शक्‍यता नाही. या स्थितीत देशांतर्गत तसेच निर्यातीची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे. 
 
पिंपळगाव बसवंत या बाजार समितीत टोमॅटोची सर्वाधिक म्हणजे दररोज १ लाख २० हजार क्रेटची आवक होते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दररोज किमान ३ लाख क्रेटची आवक झाली. दरम्यान, पावसाने नाशिक भागातील टोमॅटोला झोडपल्यानंतर आवकेत मोठी घट होत गेली. मागील वर्षी टोमॅटो उत्पादकांना खर्च निघेल इतकाही दर मिळाला नाही.
 
यंदा नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या टोमॅटोला गतवर्षीच्या तुलनेत चांगला दर मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे; मात्र यंदा खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या स्थितीत सध्याचा दर अजून महिनाभर टिकून राहिल्यास शेतकऱ्यांचा खर्च भरून निघण्यास मदत होईल, असे टोमॅटो बाजारातील जाणकारांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...