agriculture news in marathi,weekly commodity rates in market committee, nashik, maharashtra | Agrowon

नाशिकला कांद्याची आवक वाढली
ज्ञानेश उगले
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

नाशिक : जिल्ह्यात महाशिवरात्रीनंतर द्राक्ष हंगामाने वेग धरला आहे. द्राक्षाचे निर्यातीचे मार्केट स्थिर आहे. त्या तुलनेत देशांतर्गत बाजारांतून द्राक्षांना चांगली मागणी वाढली आहे. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतून गत सप्ताहात लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे.

नाशिक : जिल्ह्यात महाशिवरात्रीनंतर द्राक्ष हंगामाने वेग धरला आहे. द्राक्षाचे निर्यातीचे मार्केट स्थिर आहे. त्या तुलनेत देशांतर्गत बाजारांतून द्राक्षांना चांगली मागणी वाढली आहे. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतून गत सप्ताहात लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे.

नाशिकमधून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात होत आहे. युरोपीय बाजारपेठांत द्राक्षांची आवक क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने तेथील दर किलोला ५० ते ८० रुपये तर सरासरी ६५ रुपयांवर स्थिर आहेत. महाशिवरात्रीनंतर दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचे प्रमाण घटले असून, मागणी वाढली आहे. या स्थितीत देशांतर्गत बाजारपेठांत द्राक्षांचे दर वधारले आहेत. गत सप्ताहात देशांतर्गत बाजारपेठांत द्राक्षांना प्रतिकिलोला ३० ते ६० तर सरासरी ४५ रुपये दर मिळाले.

नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या व ४५ उपबाजार हे कांद्यासाठी प्रसिद्ध आहेत. या बाजारात मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक सुरू आहे. गत सप्ताहात प्रत्येक बाजार समितीत सरासरी १५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. लासलगाव बाजार समितीत सरासरी १८ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या स्थितीत सोमवारी (ता.२६) कांद्याला  १००० ते १३१५ रुपये, तर सरासरी ११५० रुपये क्विंटल दर मिळाले.

दरम्यान १५ फेब्रुवारीपासून बाजारातील उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. या वेळी उन्हाळ कांद्याला ९०० ते १२०१ रुपये तर सरासरी १०११ रुपये क्विंटल असा दर मिळाला. येत्या काळात कांद्याचे दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...