सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरात सुधारणा
सुदर्शन सुतार
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017
सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरात काहीशी सुधारणा झाली. भाजीपाल्याच्या दरात मात्र या सप्ताहात पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
 
सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरात काहीशी सुधारणा झाली. भाजीपाल्याच्या दरात मात्र या सप्ताहात पुन्हा तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
 
बाजार समितीत गत सप्ताहात वांग्याची रोज ३०, कोबीची २० आणि ढोबळी मिरचीची २०० क्विंटलपर्यंत आवक झाली. गेल्या महिना-पंधरवड्यापासून या फळभाज्यांच्या दरात फारशी सुधारणा होत नव्हती. मागणी चांगली असूनही दर मात्र वधारले नव्हते. या सप्ताहात मात्र बाहेरूनही मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाली. वांग्याला ८० ते ३५० रुपये तर सरासरी १५० रुपये, कोबीला ५० ते १५० रुपये तर सरासरी १०० रुपये तर ढोबळी मिरचीला ७० ते २०० रुपये तर सरासरी १२५ रुपये प्रतिदहा किलो दर मिळाला. २० ते ४० रुपयांच्या फरकाने प्रतिदहा किलोमागे त्यांच्या दरामध्ये सुधारणा झाली.
 
हिरवी मिरची, बटाट्याची आवकही रोज किमान १०० ते २०० क्विंटलपर्यंत होती. हिरव्या मिरचीला १०० ते २०० रुपये आणि बटाट्याला १०० ते १५० रुपये प्रतिदहा किलो दर होता.  
 
मेथी, शेपू, कोथिंबिरीच्या दरात पुन्हा तेजी राहिली. भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ७०० ते ११०० रुपये, शेपूला ४०० ते ६०० रुपये आणि कोथिंबिरीला १००० ते १८०० रुपये दर मिळाला. कांद्याचे दर पुन्हा ‘जैसे थे’ होते. कांद्याची रोज ४० ते ५० गाड्यांपर्यंत आवक होती. कांद्याला २०० ते २२०० रुपये तर सरासरी ११०० रुपये क्विंटल दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...