agriculture news in marathi,weekly commodity rates in market committee solapur, maharashtra | Agrowon

सोलापुरात कांदा वधारला; दर ४००० रुपये क्विंटल
सुदर्शन सुतार
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017
सोलापूर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक वाढली आहे; पण मागणी चांगली असल्याने दरही चांगलेच वधारले. कांद्याला गतसप्ताहात सर्वाधिक ४००० रुपये क्विंटलवर दर पोचल्याचे; तसेच भाजीपाल्याच्या दरातील तेजीही पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 
 
सोलापूर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक वाढली आहे; पण मागणी चांगली असल्याने दरही चांगलेच वधारले. कांद्याला गतसप्ताहात सर्वाधिक ४००० रुपये क्विंटलवर दर पोचल्याचे; तसेच भाजीपाल्याच्या दरातील तेजीही पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 
 
बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक रोज जेमतेम ८० ते १०० गाड्यांपर्यंत राहिली; पण या सप्ताहात कांद्याची आवक शंभराहून २०० ते ३०० गाड्यांपर्यंत पोचली. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागासह बाहेरील जिल्ह्यातूनही होती. विशेषतः नगर, पुणे, सांगली, उस्मानाबाद भागातून कांद्याची  सर्वाधिक आवक झाली. कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा भागातूनही काही प्रमाणात आवक झाली.  पण मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या दरातील तेजी वाढली. कांद्याला किमान ७०० ते कमाल ४००० रुपये; तर सरासरी ३३०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.
 
गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याच्या दरात किंचित चढ-उतार वगळता दर टिकून आहेत. या सप्ताहात मागणी वाढल्याने दराने आणखी उसळी घेतली. येत्या आठवड्यात आवक वाढली, तरी मागणी असल्याने दर पुन्हा वधारतील, अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली.
 
त्याशिवाय टोमॅटो, वांगी, दोडका यांच्या दरातही पुन्हा तेजी राहिली. टोमॅटो वगळता वांगी आणि दोडक्‍याची आवक तुलनेने खूपच कमी झाली. टोमॅटोची रोज अर्धा ते एक टनापर्यंत राहिली. वांगी आणि दोडक्‍याची ४० ते ८० क्विंटलपर्यंत आवक राहिली. टोमॅटोला १५० ते २५० रुपये, वांग्याला २०० ते ३५० रुपये आणि दोडका २०० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. 
 
भाजीपाल्यामध्ये कोथिंबिर, मेथी, शेपूचे दरही या सप्ताहात पुन्हा वधारलेलेच राहिले. भाज्यांची आवकही जेमतेम झाली. रोज ७ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. त्यातही मेथीला चांगला दर मिळाला. मेथीला ५०० ते १३०० रुपये, कोथिंबिरीला ७०० ते १००० रुपये आणि शेपूला ५०० ते ७०० रुपये शेकडा असा दर राहिला.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...