सोलापुरात कारले, गवार, भेंडीला उठाव

कारली
कारली

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कारले, गवार, भेंडीला मागणी वाढली. त्यांची आवकही चांगली होती; पण मागणीतील सातत्याने त्याचे दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज २०, भेंडीची ३० क्विंटल आवक होती. ही सर्व आवक उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी या स्थानिक भागातून झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मागणी वाढते आहे. शिवाय आवकेतही सातत्य आहे. त्यामुळे दरही टिकून आहेत. गवारला २०० ते ३५० रुपये, भेंडीला २०० ते ४०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला.

त्याशिवाय हिरवी मिरची, कारल्याचे दरही पुन्हा तेजीत राहिले. त्यांची आवक ही तशी कमीच होती. कारल्याला १५० ते २५० रुपये आणि हिरव्या मिरचीला १०० ते २५० रुपये प्रतिदहाकिलो इतका दर मिळाला.

भाजीपाल्यात मेथी, कोथिंबीर, शेपूची आवकही तुलनेने कमीच राहिली. भाज्यांची आवक रोज ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत होती. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी २०० ते ४०० रुपये, कोथिंबिरीला २०० ते ५०० रुपये आणि शेपूला २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला.

कांद्याच्या दरात मात्र काहीसा चढ-उतार झाला; पण या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक कमी होती. कांद्याची आवक या सप्ताहात रोज १०० ते २०० गाड्यांपर्यंत होती. कांद्याला ३०० ते १८०० रुपये तर सरासरी १४०० रूपये क्विंटल इतका दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com